सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची, एक दिवसासाठी मुंबईत रिक्षा सोडण्याची मागणी
  • मोठी बातमी: पुण्यात महापालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत; शरद पवारांची माहिती, प्रशांत जगतापांशी सखोल चर्चा
  • पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
  • अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न,
  • प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
 DIGITAL PUNE NEWS

यंदाचे शारदीय नवरात्र : 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर – १० दिवसांचा उत्सव

डिजिटल पुणे    20-09-2025 10:53:46

सोलापूर : आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्राचा आरंभ होतो, यावर्षी 22 सप्टेंबर रोजी सोमवारी नवरात्रारंभ होणार असून याच दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाईल. साधारणपणे नवरात्र हे नऊ दिवसांचे असते. परंतु तिथीच्या क्षयवृद्धीमुळे कधी नवरात्र हे ८ किंवा १० दिवसांचे होऊ शकते. यावर्षी तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र १० दिवसांचे असणार आहे.   

गेल्या वर्षी 2024 मध्ये देखील तृतीया वृद्धीतिथी होती आणि नवरात्र 10 दिवसांचे होते. नवरात्रामध्ये देवीस रोज एक माळ अर्पण करताना जितक्या दिवसाचे नवरात्र असेल तेवढ्या माळा रोज एक याप्रमाणे अर्पण कराव्यात. वृद्धी असल्याने दोन दिवसांच्या दोन स्वतंत्र माळा अर्पण कराव्यात. अनेकजण नवरात्रीचे सर्व दिवस उपवास करतात मात्र काही कारणाने ते शक्य नसल्यास पहिल्या आणि शेवटच्या दिवशी करावा. तसे करणे ही शक्य नसल्यास किमान अष्टमीचे दिवशी तरी करावा.

नवरात्रापूर्वी अशौच आल्याने प्रतिपदेस नवरात्र बसविता येणार नसेल तर अशौच संपल्यावर सप्तरात्रोत्सवारंभ (24 सप्टेंबर), पंचरात्रोत्सवारंभ (27 सप्टेंबर), त्रिरात्रोत्सवारंभ (29 सप्टेंबर) किंवा एकरात्रोत्सवारंभ (30 सप्टेंबर) असे पंचांगात दिलेल्या दिवशी कमी दिवसाचे नवरात्र करावे. वयोमाना मुळे सुद्धा असे कमी करता येईल.नवरात्रामध्ये देवीचा टाक किंवा मूर्ती याची वेगळी स्थापना करून पूजा केली जाते. काही जणामंध्ये इतर देवांची पूजा ९ दिवस केली जात नाही, ते अयोग्य आहे. अशा वेळेस पूजेतील इतर देवांची अभिषेक करुन नेहमी प्रमाणे रोज पूजा करावी आणि घटावर / टाकावर फुलाने पाणी शिंपडून पूजा करावी.

यावर्षीच्या नवरात्रातील काही प्रमुख दिवस -

ललिता पंचमी :- 26 सप्टेंबर, शुक्रवारी

महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) :- 29 सप्टेंबर, सोमवारी

दुर्गाष्टमी, श्रीसरस्वती पूजन, महाष्टमी उपवास :- 30 सप्टेंबर, मंगळवारी

महानवमी, नवरात्रोत्थापन :- 1 ऑक्टोबर, बुधवारी

विजयादशमी (दसरा) :- 2 ऑक्टोबर, गुरुवारी (विजय मुहूर्त – दुपारी २:२७ ते ३:१५)

नवरात्रामध्ये अखंड नंदादीप लावला जातो काही वेळेस वाऱ्याने किंवा काजळी काढताना तो विझतो. अशा वेळेस काही अशुभ नसते, तो नंदादीप पुन्हा लावता येतो. ( दाते पंचांगानुसार माहिती )        ईश्वर स्वामी होळीमठ (ज्योतिष शास्त्री) सोलापूर.


 Give Feedback



 संबंधित बातम्या
 जाहिराती
 जाहिराती