दिल्ली: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कार बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी डॉ. उमर मोहम्मद याचे पुलवामा येथील घर सुरक्षा यंत्रणांनी आयईडीने उडवून दिले आहे. दहशतवादाविरुद्धच्या कारवाईचा एक भाग म्हणून, सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि संपूर्ण कारवाई नियंत्रित पद्धतीने पार पाडली.
या स्फोटाच्या तपासात अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. गुरुवारी फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये या स्फोटाशी संबंधित आणखी एक कार आढळली. पोलिसांच्या माहितीनुसार, ही कार डॉ. शाहीन शाहिद यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, त्याला "व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल" प्रकरणात आधीच अटक करण्यात आली आहे. फरीदाबाद पोलिसांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीर पोलिस विद्यापीठात सापडलेल्या संशयास्पद मारुती ब्रेझा कारची चौकशी करत आहेत. संशयास्पद कार आढळल्यानंतर, बॉम्ब शोध पथकाला वाहनाची तपासणी करण्यासाठी पाचारण करण्यात आले. विद्यापीठ कॅम्पसमध्ये पार्क केलेल्या इतर वाहनांची देखील तपासणी केली जात आहे आणि त्यांच्या मालकांची माहिती पडताळली जात आहे.
लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या प्रमुख आरोपी डॉ. उमर मोहम्मद याच्या पुलवामा येथील घरावर सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. दहशतवादाविरोधातील मोहिमेचा एक भाग म्हणून, सुरक्षा यंत्रणांनी त्याचे घर आयईडी स्फोटाने उद्ध्वस्त केले. संपूर्ण परिसर सुरक्षित करून कारवाई करण्यात आली.
फरीदाबादमध्ये संशयास्पद दुसरी कार
तपासादरम्यान फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये स्फोटाशी संबंधित आणखी एक कार आढळली आहे. ही कार डॉ. शाहीन शाहिद यांच्या नावावर असून, तो आधीच “व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल” प्रकरणात अटक आहे. बॉम्ब स्क्वॉडला वाहनाची तपासणी करण्यासाठी पाचारण करण्यात आले असून, परिसरातील इतर वाहनांचीही पडताळणी सुरू आहे.
एन्क्रिप्टेड स्विस अॅपवरून दहशतवादी कट
तपासात उघड झाल्यानुसार, प्रमुख आरोपी डॉ. उमर मोहम्मद, डॉ. मुझम्मिल अहमद आणि डॉ. शाहीन शाहिद यांनी एक एन्क्रिप्टेड स्विस मेसेजिंग अॅप वापरून संपूर्ण दहशतवादी मोहिमेचे नियोजन केले होते.
डीएनए चाचणीत लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेली पांढरी Hyundai i20 ही कार डॉ. उमर चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हरियाणातील नुहमध्ये छापे – खत व बियाणे विक्रेता ताब्यात
दरम्यान, हरियाणातील नुह (पिनांगवा) येथे छापेमारी करून एका खत व बियाणे विक्रेत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी मोठ्या प्रमाणात NPK खताची खरेदी केल्याचा संशय आहे, जे आयईडी बनवण्यासाठी वापरले जाऊ शकते.
तिसरी कारही जप्त
फरिदाबादच्या खंडावली गावातून लाल रंगाची Ford EcoSport जप्त करण्यात आली आहे. ही कार पार्क करणाऱ्या व्यक्तीला अटक करून वाहन दिल्ली पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.तपासात आतापर्यंत तीन कार आयईडी वाहतुकीसाठी वापरल्या गेल्याचे समोर आले आहे.
दिल्लीमध्ये उच्च सतर्कता
प्रकरणाच्या तपासाचा व्याप वाढत असून, दिल्ली पोलिसांनी शहरातील सर्व ठाण्यांना, चौक्यांना आणि सीमावर्ती भागांना अलर्ट जारी केला आहे.