पुणे : मुंबई–बेंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ गुरुवारी (दि. 13) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात 3 वर्षांच्या चिमुकलीसह 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 20 ते 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा नवले पुल परिसरातील रस्त्यांची भीषण परिस्थिती अधोरेखित झाली आहे.प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, साताऱ्याकडून कात्रजच्या दिशेने उतारावरून भरधाव वेगात येणाऱ्या मोठ्या कंटेनरचे ब्रेक अचानक निकामी झाले. नियंत्रण सुटलेला कंटेनर रस्त्यावरच्या 10 ते 15 वाहनांवर धडकू लागला. यामध्ये दुचाकी, चारचाकी आणि ट्रॅव्हलर बस चिरडून गेल्या.
मुंबई–बेंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ गुरुवारी (दि. 13) सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा शहर हादरले. या दुर्घटनेत 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात 3 वर्षांची चिमुकलीही होती. तसेच 20 ते 22 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता या अपघाताची मन सुन्न करणारी कहाणी प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे.
प्रत्यक्षदर्शी म्हणाले की, “मी चहा घेत होतो. अचानक जोराचा आवाज आला. मागे पाहिले तर एक कंटेनर नियंत्रण सुटून उतारावरून सर्व वाहनांना धडक देत होता. त्याने एका कारला जबरदस्त धडक दिली. ती कार पुढच्या ट्रकला जाऊन अडकली. आत अडकलेल्या लोकांचा ‘वाचवा, वाचवा!’ असा जीवघेणा आवाज येत होता. आम्ही मदतीसाठी धावलो, पण अचानक मोठा स्फोट झाला आणि आग भडकली. आम्ही मागे सरकलो. त्याच वेळी एका कंपनीची बस कर्मचाऱ्यांना घेऊन घरी निघाली होती. या बसमधील कर्मचाऱ्यांनी घाबरून बाहेर रस्त्यावर उडी घेतली. त्यांच्या मदतीने आम्ही बचाव कार्यास सरसावलो, असे त्यांनी सांगितले.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले,
“मी चहा घेत होतो. अचानक प्रचंड आवाज आला. मागे पाहिले तर कंटेनर उतारावरून सर्व वाहनांना उडवत खाली येत होता. एका कारला इतकी जोरदार ठोकर दिली की ती पुढच्या ट्रकमध्ये अडकली. आत अडकलेल्या लोकांचा ‘वाचवा, वाचवा’ असा हृदयद्रावक आवाज येत होता. आम्ही धाव घेतली, पण काही क्षणांतच भीषण स्फोट झाला आणि आग भडकली.”कंटेनरच्या डिझेल टँकला लागलेल्या आगीत काही सेकंदांतच कार आणि कंटेनरचा समोरील भाग जळून खाक झाला. कारमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. कंटेनर चालक आणि क्लीनर हेदेखील आगेत होरपळले.
एक कंपनीची बस त्याच वेळी त्या ठिकाणी पोहोचली. घाबरलेले कर्मचारी रस्त्यावर उड्या मारून खाली उतरले. त्यांच्या मदतीने स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले. पण आगीचा भडका इतका प्रचंड होता की आत अडकलेल्या नागरिकांना वाचवणे शक्य झाले नाही.
दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले,
“आम्ही तात्काळ अग्निशमन दलाला कळवले. पण नवले पुलाजवळ सातत्याने अपघातांची मालिका घडत आहे. हा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे.”अग्निशमन दलाने वेळेत दाखल होऊन आग नियंत्रणात आणली. जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.
नेमका अपघात कसा झाला?
गुरुवारी सायंकाळी पुण्यातील नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात एका 3 वर्षांच्या चिमुकलीसह आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 22 जण जखमी झाले. या भीषण दुर्घटनेमागील घटनाक्रम प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे साताऱ्याकडून कात्रजच्या दिशेने उतारावरून भरधाव वेगात येणाऱ्या मोठ्या कंटेनरचे अचानक ब्रेक फेल झाले. ब्रेक निकामी होताच चालकाचे वाहनावरचे नियंत्रण पूर्णपणे सुटले. ब्रेक न लागल्याने नियंत्रण सुटलेल्या कंटेनरने रस्त्यावरच्या 10 ते 15 वाहनांना जोरदार धडक दिली. यामध्ये अनेक दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहने पूर्णपणे चेंगराचेंगरीसारखी चिरडली गेली. धडकेदरम्यान कंटेनरने एका ट्रॅव्हलर बसला जबरदस्त ठोकर दिली.
बसमध्ये 18 ते 20 प्रवासी होते. या धडकेने बस पलटी झाली आणि आत अडकलेल्या प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. या सर्व गोंधळात कंटेनरच्या डिझेल टँकला आग लागली. पेटलेला कंटेनर ब्रेक नसल्यामुळे तसाच पुढे घसरत राहिला. पुढे जात असताना कंटेनरने सेल्फी पॉइंटजवळ असलेल्या एका टुरिस्ट कारला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार समोरील दुसऱ्या कंटेनरमध्ये अडकून गेली. कार दोन्ही अवजड कंटेनरच्या मध्ये चिरडल्याने त्यातील लोकांना बाहेर पडण्याची कोणतीही संधीच उरली नाही. ते ‘वाचवा, वाचवा’ अशी किंकाळी करत असतानाच कारने पेट घेतला. आगीचा भडका इतका भीषण होता की काही क्षणांतच कार आणि कंटेनरचा समोरील भाग जळून खाक झाला. या घटनेत कारमधील दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. कंटेनर चालक आणि क्लीनर हेदेखील या आगेत होरपळून मरण पावले.अग्निशमन दलाने वेळेत दाखल होऊन आग नियंत्रणात आणली. जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.