मुंबई : माय भारत- मुंबईतर्फे पोलीस विभागाच्या सहकार्याने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मरोळ येथे ‘सरदार@१५० युनिटी पदयात्रा’ उत्साहात पार पडली.ही पदयात्रा मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून सुरू होऊन सेव्हन हिल्स रुग्णालयात समारोपाला पोहोचली. पदयात्रेदरम्यान सहभागी नागरिकांनी आत्मनिर्भर भारत आणि नशामुक्त भारत घडविण्याची प्रतिज्ञा केली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र दळवी व प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, मरोळ यांनी सरदार पटेल यांच्या कार्याचा आदर्श ठेवून समाजात एकता आणि बांधिलकी वाढविण्याचे आवाहन केले.या उपक्रमात विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी, पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.