सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय, निकालाची नवी तारीखही जाहीर!
  • एकनाथ शिंदेंनी आणल्या पैशांच्या बॅगा; नव्या व्हिडीओने खळबळ, मालवणमध्ये शिवसेनेनंही पैसे वाटल्याचा माजी आमदाराचा दावा
  • मोठी बातमी: नगरपरिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदार सापडले, दोनजण ताब्यात, गाड्या भरुन बोगस मतदार आणल्याची माहिती
  • नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होताच EVM मशीन धडाधड बंद पडल्या, अपक्ष उमेदवाराचं बटणचं दाबलं जाईना
 विश्लेषण

नगरपरिषद निवडणुकीत EVM मशीनचा खेळखंडोबा,EVM मशीन ठप्प; अनेक मतदान केंद्रांवर गोंधळ

डिजिटल पुणे    02-12-2025 11:21:37

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. तसेच मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. बहुतांश ठिकाणी सकाळी 7: 30 वाजतापासून मतदानास सुरुवात झाली असून मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे बघायला मिळाले आहे. दरम्यान सांयकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. तर या निवडणुकांची मतमोजणी लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी होणार आहे. असं सगळं असताना राज्यातील अनेक मतदान केंद्रावर प्रशासनाचा सावळा कारभार बघायला मिळाला आहे. अनेक ठिकाणी नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होताच EVM मशीन बंद पडल्याचे बघायला मिळाले आहे. त्याचा फटका आता मतदारांना आणि एकंदरीत प्रक्रियेवर होणार आहे.

महाराष्ट्रातील 264 नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदानाला सुरुवात झाल्याबरोबर अनेक केंद्रांवर EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. सकाळी 7:30 पासून मतदान सुरू झाले असले तरी अनेक मतदारांना रांगेत थांबावे लागत आहे. सांयकाळी 5:30 पर्यंत मतदान होणार असून उद्या बुधवारी मतमोजणी होईल.

मोहोळ : नेताजी प्राशाळेत मतदान अर्धा तास ठप्प

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषदेतील नेताजी प्राशाळेत EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जवळपास अर्धा तास मतदान बंद होते. कर्मचारी मशीन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत असून मतदारांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

आरोप–प्रत्यारोपाचा सुरुवात

सोलापुरातील मोहोळमध्ये आणखी एका मतदान केंद्रावरील मशीन बंद पडली आहे. मोहोळ शहरातील आठवडी बाजार मतदान केंद्रावरील मशीन बंद पडली आहे. मशीन बंद पडल्यावरुन आता माजी आमदार रमेश कदम यांनी भाजपवर आरोप केलाय. मतदान केंद्रावरील वोटिंगमशीन वर केवळ भाजप चिन्हाचे बटन दाबले जात असल्याचा रमेश कदमांनी आरोप केलाय. तर विरोधकांना पराभव दिसत असल्याने त्यांच्या पायाखालीची वाळू सरकली, असे प्रत्युत्तर भाजप उमेदवार सुशील क्षीरसागर यांनी दिलंय. प्रभाग क्रमांक 2 मधील 1 नंबर बुथवरील मशीन 1 तासापासून बंद आहे. भाजप उमेदवार शितल क्षीरसागर आणि माजी आमदार रमेश कदम मतदान केंद्रावर दाखल झाले असून मशीन बंद पडल्या बाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत आहेत.

बुलढाणा–चिपळूणमध्येही बिघाड

बुलढाण्यातील खामगाव येथील प्रभाग क्रमांक 8 येथील मतदान केंद्र क्रमांक आठ आणि दोनमध्ये मशीनमध्ये बिघाड झालाय. परिणामी गेल्या 35 मिनिटांपासून मतदान ठप्प झालं आहे. तर अद्यापही मतदान सुरू झालेलं नाही. त्यामुळे मतदारांना मनस्थाप सहन करावा लागतोय. तर दुसरीकडे चिपळूण मध्ये देखील EVM मशीन बंद पडल्याने मतदार खोळंबलेत. खेंड मतदान केंद्रावरील EVM मशीन दोन वेळा बंद पडले आहेत. आता प्रशासनाकडून मशीन सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहे. मात्र मतदार रांगेत उभे राहून प्रतीक्षा करत आहे.

अक्कलकोटमध्येही अडथळे.सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमधील नगर परिषद मुला - मुलींची उर्दू शाळेतील देखील EVM मशीन बंद पडली आहे. मतदान केंद्र क्रमांक 9 वरील 2 नंबर खोली मधील मशीन तब्बल अर्ध्या तासापासून बंद आहे. परिणामी, सकाळच्या सत्रात मतदान करायला आलेल्या मतदारांची तारांबळ उडालीय. निवडणूक कर्मचाऱ्यांनाकडून मशीन पूर्ववत करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत.


 Give Feedback



 जाहिराती