सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांना मोठा झटका, मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
  • a: महाड नगरपरिषद निवडणुकीत तुफान राडा, भरत गोगावलेंच्या मुलाला रिव्हॉल्व्हर दाखवली, सुशांत जाबरेंना जबर मारहाण
  • मोठी बातमी : उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय, निकालाची नवी तारीखही जाहीर!
  • एकनाथ शिंदेंनी आणल्या पैशांच्या बॅगा; नव्या व्हिडीओने खळबळ, मालवणमध्ये शिवसेनेनंही पैसे वाटल्याचा माजी आमदाराचा दावा
  • मोठी बातमी: नगरपरिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदार सापडले, दोनजण ताब्यात, गाड्या भरुन बोगस मतदार आणल्याची माहिती
  • नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होताच EVM मशीन धडाधड बंद पडल्या, अपक्ष उमेदवाराचं बटणचं दाबलं जाईना
 विश्लेषण

महाड नगरपरिषद निवडणुकीत तुफान राडा; गोगावले–जाबरे समर्थकांमध्ये हाणामारी, रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा आरोप

डिजिटल पुणे    02-12-2025 16:45:11

रायगड : रायगड रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषदेसाठी आज मतदान पार पडत आहे. यावेळी गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी जबर मारहाण केल्याची माहिती आहे. विकास गोगावले यांच्या समर्थकांनी सुशांत जाबरे यांच्या समर्थकांच्या अनेक गाड्यांची तोडफोड केली आहे. त्यामुळे सध्या महाडमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान आज मोठा गोंधळ उसळला. शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेते सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये नवे नगर परिसरात तुफान हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.घटनादरम्यान सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला विकास गोगावले यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जाबरे समर्थकांच्या अनेक वाहनांची तोडफोडही करण्यात आली.

वादाची ठिणगी कशी पेटली?

प्राथमिक माहितीनुसार, महाडच्या नवे नगर परिसर ही हाणामारी झाली. सुशांत जाबरे यांनी निवडणुकीपूर्वी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.सकाळी महाड नगरपरिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाली असताना काही ठिकाणी EVM बंद पडल्याने तणाव निर्माण झाला.यामुळे दोन्ही गटांचे कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर जमा झाले.बाचाबाचीचे रुपांतर लगेचच दगडफेकीत आणि मारहाणीत झाले.या दरम्यान एका समर्थकाने विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.विकास गोगावले हे शस्त्रासह पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती मिळते.

राजकीय पार्श्वभूमी

सुशांत जाबरे यांनी अलीकडेच शिंदे गटाला सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गेल्या काही काळापासून भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात राजकीय वाद तीव्र झाला असून त्याचे प्रतिबिंब या घटनेतही दिसले.

तटकरे यांची प्रतिक्रिया

सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केला की, "मतदान केंद्रात फक्त अधिकृत उमेदवार आणि प्रतिनिधींनाच प्रवेशाचा अधिकार आहे. तरीही युवा नेते म्हणवणारे मतदान केंद्रात जाऊन आरओसोबत हुज्जत घालत आहेत. विकास गोगावले सरळ आत जात आहेत, हे बेकायदेशीर आहे."

पोलिसांची भूमिका

ही बाचाबाची सुरु असताना सुशांत जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याची माहिती आहे. त्यामुळे हा वाद चिघळला. विकास गोगावले हे रिव्हॉल्व्हर घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्याची माहिती आहे. याप्रकरणात आता पोलीस काय कारवाई करणार, हे बघावे लागेल.महाड पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही गटांविरुद्ध नेमकी कोणती कारवाई केली जाणार याकडे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती