सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गोरेगावातील जनतेसाठी नवी आशा, समाजसेवक संदीप जाधव यांच्यामुळे पाणीटंचाई आणि अंधाराचा प्रश्न सुटला
  • मस्साजोगमध्ये आजपासून 9 डिसेंबर काळा दिवस म्हणून पाळणार; अधिवेशनामध्ये संतोष देशमुख प्रकरणावर निवेदन दिलं जावं; धनंजय देशमुखांची मागणी
  • स्ट्राँग रुममध्ये EVM चा संशयास्पद आवाज, दोन्ही शिवसेनेचा आक्षेप, गोंधळानंतर आजपासून खडा पहारा
  • फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
  • उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; ZP अन् पंचायत समितीचा आढावा, मनसेबाबतही सूचना
 DIGITAL PUNE NEWS

मोठी बातमी : “चल, तुला शाळेत सोडतो” म्हणत पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार; नराधमाला बेड्या

डिजिटल पुणे    09-12-2025 16:36:55

पुणे :  विश्रांतवाडी – पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात 14 वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीला “शाळेत सोडतो” असा विश्वास देत आरोपीने तिला दुचाकीवर बसवले आणि शाळेत न नेत थेट एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून तो महाविद्यार्थी असल्याचे समोर आले आहे.  चार  डिसेंबर रोजी हा प्रकार घडला असून पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली केला. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुनाकिब अन्सारी हा महाविद्यालयीन विद्यार्थी असून त्याची आणि पीडित मुलीची ओळख काही दिवसांपूर्वी एका बसस्टॉपवर झाली होती. चार डिसेंबर रोजी त्याने तिला "शाळेत सोडतो" असे सांगत विश्वासात घेतले आणि तिला आपल्या दुचाकीवर बसवले. मात्र शाळेत न नेत, आरोपी तिला एका खोलीत घेऊन गेला आणि तेथे जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला.

नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अत्याचारानंतर पीडित तरुणीने कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तत्काळ विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अल्पावधीत तपास सुरू करून आरोपीचा शोध घेतला व त्याला अटक केली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरीत तपास सुरू करून आरोपीचा शोध घेतला व त्याला अटक केली. आरोपीविरोधात पोक्सो कायद्यासह संबंधित गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा सवाल निर्माण झाले आहेत.


 Give Feedback



 जाहिराती