सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी
  • धक्कादायक! तळेगाव MIDC मध्ये गॅस गळतीमुळं दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण
  • काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
  • महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
 शहर

बोधनी प्रतिष्ठानतर्फे अधिक मासानिमित्त ३३ दांपत्यांचा गौरव समारंभ ! पूजा,भोजनासह यथोचित आयोजन ;उत्तम सामाजिक कामगिरी करणाऱ्या दांपत्यांना निमंत्रण

डिजिटल पुणे    14-05-2026 14:33:13

पुणे : अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मासानिमित्त पुण्यातील  परंपरा जपणाऱ्या बोधनी   प्रतिष्ठान कडून ३३ दांपत्यांचा गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पूजा,भोजनासह  यथोचित आयोजन करण्यात आले आहे.रविवार,दि.१७ मे २०२६   रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी दीड या वेळेत हा पारंपरिक कार्यक्रम अश्वमेध मंगल कार्यालय ,कर्वे रस्ता येथे होणार आहे.

बोधनी  प्रतिष्ठानच्या वतीने  अध्यक्ष  शिरीष बोधनी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.'अधिक मासात जावयाला भोजन आणि भेटवस्तू,दान देण्याची धार्मिक परंपरा आहे. त्यात अनोखी भर टाकण्यासाठी समाजात उत्तमोत्तम कामगिरी करणाऱ्या दांपत्यांना निमंत्रित करून त्यांचा यथोचित गौरव करण्याचा घाट घातला आहे',असे शिरीष बोधनी यांनी सांगितले. या दांपत्यांना दीपदान देखील करण्यात येणार आहे.

 या गौरव कार्यक्रमाला  प्रा. विकास मठकरी,नगरसेविका मंजुषा खर्डेकर,अभिनेते राहुल सोलापूरकर,किशोर सरपोतदार,अरविंद पटवर्धन, दीपक बोधनी,डॉ.पराग कश्यप आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 


 Give Feedback



 जाहिराती