सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी
  • धक्कादायक! तळेगाव MIDC मध्ये गॅस गळतीमुळं दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण
  • काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
  • महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
 शहर

'कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमान्यातील सत्यशोधन; विवेक सावंत यांच्याशी १६ मे रोजी संवाद

डिजिटल पुणे    14-05-2026 14:34:47

 पुणे : एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने  'कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमान्यातील सत्यशोधन'  या विषयावर महाराष्ट्र ज्ञान विज्ञान महामंडळाचे मेंटॉर विवेक सावंत यांच्याशी  संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार,दि.१६ मे २०२६ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता हे संवाद सत्र फाऊंडेशनच्या नवी पेठ(पुणे ) इमारतीमधील प्रशिक्षण सभागृहात होईल.  एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष साथी सुभाष वारे हे ही या संवाद सत्रात सहभागी असतील.
महात्मा फुले यांच्या जन्म द्विशताब्दी निमित्त हे आयोजन केले जात आहे. 
 
पुरोगामी, विवेकी चळवळीतील कार्यकर्त्यांनी या संवाद सत्रात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. सहभाग घेण्यासाठी उपेंद्र टण्णू (9881701881) किंवा राहुल भोसले (9822962850) यांचेकडे नोंदणी करावी,असे आवाहन करण्यात आले  आहे.

 

 


 Give Feedback



 जाहिराती