सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : पोर्शे कारने उडवून दोघांचा जीव घेतला, पण अग्रवाल कुटुंबाचा मस्तवालपणा कायम, जेलमधून सुटताच जंगी सेलिब्रेशन
  • केरळमध्ये ED विरुद्ध कार्यकर्त्यांचा संताप; अधिकाऱ्यांच्या कारवर हल्ला, विटाही फेकल्या, मोदींविरुद्ध घोषणाबाजी
  • मोठी बातमी : डी के शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, तर लिंगायत, दलित, OBC आणि अन्य असे तब्बल 4 उपमुख्यमंत्रीही दिमतीला
 जिल्हा

अपघातग्रस्त कामगारांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी तातडीच्या उपाययोजना करा – मंत्री आकाश फुंडकर

डिजिटल पुणे    27-05-2026 16:39:45

मुंबई : राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा लागलेल्या कामगारांना पुन्हा पूर्ववत आयुष्य जगता यावे. अपघातग्रस्त कामगारांवर तातडीने शस्त्रक्रिया करून त्यांचे तुटलेले हात पुन्हा प्रत्यारोपित करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले. या संदर्भातील प्रायोगिक तत्वावर पुणे जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांमध्ये उपक्रम राबविण्यात यावा, अशा सूचनाही कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी दिल्या.

याबाबत नरिमन भवन येथे आयोजित बैठकीत मंत्री ॲड. फुंडकर बोलत होते. बैठकीस दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. तर प्रत्यक्षरित्या अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी तुम्मोड, उपसचिव दीपक पोकळे उपस्थित होते.

अपघात झाल्यास पहिल्या काही तासांचा अवधी अत्यंत महत्वाचा असतो. त्यामुळे हात प्रत्यारोपण करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांची अद्ययावत माहिती सर्व कारखाने आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये असणे अनिवार्य करण्यात यावे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत कामगारांना तातडीने मदत मिळेल. कामगारांना किंवा व्यवस्थापनाला अपघाताच्या वेळी त्वरित संपर्क साधता यावा आणि पुढील वैद्यकीय मार्गदर्शनासाठी दिशा मिळावी, यासाठी ‘हेल्पलाईन क्रमांक’ जारी करण्यात यावा, अशा सूचनाही कामगार मंत्री ॲड फुंडकर यांनी दिल्या.


 Give Feedback



 जाहिराती