सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबईत कोस्टल रोडच्या बोगद्यात धावती कारला आग, सर्व गाड्या सोडून पळाले, भुयारात धुराचे मोठे लोट वाहतूक बंद!
  • पुण्यात निलेश घायवळ गँग पुन्हा सक्रिय? कोथरुडमध्ये मोबाईल व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; जुन्या गुन्ह्याशी कनेक्शनची चर्चा
 DIGITAL PUNE NEWS

मुंबई-पुणे महामार्गावरील भीषण कोंडी; मुसळधार पावसाने वाढवल्या अडचणी; 9 तास ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या धनश्री काडगांवकरची पोस्ट व्हायरल

डिजीटल पुणे    08-07-2026 13:23:29

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात झालेल्या भूस्खलनानंतर सोमवारी वाहतूक अनेक तास ठप्प झाली. या वाहतूक कोंडीत मराठी अभिनेत्री धनश्री काडगांवकर तब्बल नऊ तास अडकून पडली होती. या अनुभवाबाबत तिने सोशल मीडियावर व्हिडिओ आणि भावनिक पोस्ट शेअर करत त्या दिवसातील अडचणींचा उल्लेख केला आहे.

धनश्रीने सांगितले की, प्रवासादरम्यान तिला मासिक पाळी सुरू होती. वॉशरूमला जाण्याची गरज असूनही ती शक्य होत नव्हती. तसेच अन्न किंवा पाणी घेण्यासाठीही वाहनातून उतरता येत नव्हते. परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परिस्थिती आणखी कठीण झाली होती.

तिच्या म्हणण्यानुसार, चालकाने पुण्याकडे परतण्याचा सल्ला दिला होता. मात्र, शूटिंगचे वेळापत्रक आणि व्यावसायिक जबाबदारी लक्षात घेऊन तिने मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. अखेर संथ गतीने वाहतूक सुरू झाल्यानंतर ती शूटिंगच्या सेटवर पोहोचली.पोस्टच्या शेवटी धनश्रीने निसर्गाच्या शक्तीपुढे माणूस हतबल असल्याचे सांगत, अशा संकटामुळे कोणाचेही आयुष्य विस्कळीत होऊ नये, अशी प्रार्थना व्यक्त केली.


 Give Feedback



 जाहिराती