सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘सायकल शिकवतो’ म्हणत चिमुकलीला शेतात नेलं; पिंपळवंडीत अत्याचारानंतर हत्या, ग्रामस्थांचा संताप
  • नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
 जिल्हा

सर्व जिल्ह्यांतील हिरकणी कक्ष स्वच्छ, सुसज्ज आणि कार्यक्षम ठेवावेत – मंत्री आदिती तटकरे

डिजिटल पुणे    05-08-2026 14:34:12

मुंबई : शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील महिला कर्मचारी आणि कार्यालयात येणाऱ्या मातांसाठी सर्व हिरकणी कक्ष स्वच्छ, सुसज्ज व कार्यक्षम ठेवावेत. ज्या ठिकाणी हे कक्ष उपलब्ध नाहीत, तेथे तातडीने उभारणी करावी. तसेच प्रत्येक कक्षाच्या नियमित स्वच्छतेची जबाबदारी निश्चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

राज्यातील हिरकणी कक्षांच्या स्वच्छता, देखभाल आणि मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. मंत्री तटकरे म्हणाल्या की, महिलांच्या आरोग्य, सन्मान आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक कार्यालयात हिरकणी कक्ष असणे अत्यावश्यक आहे. राज्यात सध्या ७०२ हिरकणी कक्ष कार्यरत असून ७६ नवीन कक्षांचे काम सुरू आहे. ज्या जिल्ह्यांत किंवा कार्यालयांत हिरकणी कक्ष उपलब्ध नाहीत, तेथे तातडीने उभारणी करण्यात यावी.

त्यांनी जिल्ह्यातील सर्व एसटी बसस्थानके, जिल्हा परिषद मुख्यालये, पंचायत समित्या आणि शासकीय कार्यालयांतील हिरकणी कक्षांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले. कक्ष, परिसर, खिडक्या व दरवाज्यांची स्वच्छता आणि सुस्थितीची तपासणी करून मातांच्या गोपनीयता व सुरक्षेची पूर्ण खबरदारी घ्यावी. तसेच कक्षांमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. बंद किंवा अकार्यक्षम कक्ष तातडीने सुरू करावेत आणि वार्षिक देखभाल कराराची जबाबदारी संबंधित यंत्रणेवरच निश्चित करण्यात यावी व त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

महिलांसाठी उपलब्ध असलेल्या स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता, देखभाल आणि आवश्यक सुविधा सुनिश्चित करण्याचे निर्देशही मंत्री तटकरे यांनी दिले. महिलांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ही स्वच्छतागृहे नेहमी वापरण्यायोग्य राहतील, यासाठी संबंधित यंत्रणांनी नियमित पाहणी करून आवश्यक सुधारणा कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.बैठकीस महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त वर्षा लड्डा, उपायुक्त गिरासे, उपसचिव आनंद भोंडवे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती