सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 विश्लेषण

कोथरूड मतदार संघात पहिल्या फेरीत भाजपचे चंद्रकांत पाटील ३३,१४७ मतांनी आघाडीवर

डिजिटल पुणे    23-11-2024 12:08:13

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असून, महायुतीला 221 पेक्षा जास्त ठिकाणी आघाडी मिळाल्याचं दिसून येत आहे. भाजपला एकट्याला 131 ठिकाणी आघाडी मिळाली आहे, ज्यामुळे महायुतीच्या विजयाचा उत्साह वाढला आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमध्ये लाडू वाटून विजयाचा जल्लोष केला. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत असतील, तर त्यांचे स्वागत करण्यात येईल. तसेच, या निर्णयाची अंमलबजावणी वरिष्ठ पातळीवर केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

कोथरूडमधून स्वतः चंद्रकांत पाटील हे आघाडीवर असून त्यांचा विजय आता निश्चित मानल जात आहे. त्याचवेळी यावेळी भाजपची इतिहासातील सर्वात चांगल्या कामगिरीकडे वाटचाल सुरू असून 131 ठिकाणी आघाडी घेतल्याचं दिसून आलं. तर महायुतीने 221 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाने 56 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीने 35 जागांवर आघाडी घेतली आहे. जपचे चंद्रकांत पाटील यांना ५०,४५१, चंद्रकांत मोकाटे (शिवसेना - यूबीटी) यांना २००४८,  किशोर शिंदे (मनसे) यांना ५,७८७ सध्या भाजपचे चंद्रकांत पाटील ३३,१४७ मतांनी आघाडीवर आहेत. 

भाजपच्या कार्यकर्त्यांनी अंतिम निकाल आल्याशिवाय जल्लोष साजरा करू नये असं वरिष्ठांकडून निर्देश देण्यात आले आहेत. त्याचवेळी भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी मात्र जल्लोषाला सुरुवात केली आहे. चंद्रकांत पाटलांच्या कोथरुडमधील कार्यालयामध्ये 200 किलो लाडू आणण्यात आले आहेत.दरम्यान, सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसचे अनेक नेते पिछाडीवर पडल्याचं दिसून आलं. त्यामध्ये बाळासाहेब थोरात हे सुरुवातीपासून पिछाडीवर असल्याचं दिसतंय


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती