सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 विश्लेषण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विजयी, नागपूर दक्षिण- पश्चिममध्ये फुललं कमळ

डिजिटल पुणे    23-11-2024 12:36:37

 मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. सध्याच्या कलानुसार महायुती 216 जागांवर आघाडीवर आहे. यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप १२८ जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यापाठोपाठ शिंदे गट ५४ आणि अजित पवार गट ३५ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. या अभूतपूर्व यशानंतर आता भाजपकडून सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याची चिन्हं सध्या पाहायला मिळत आहे.

आता नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या आईसोबत फोनवर बोलताना दिसत आहे. भाजप महायुतीला मिळालेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची आई सरिता फडणवीस यांनी नागपूरहून फोन केला. त्यावेळी त्यांना त्यांच्या आईने शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी त्यांना नागपूरला केव्हा येतो, असेही त्यांना विचारले. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी मी संध्याकाळी घरी नागपूरला येतो. इथे सर्व आवरतो आणि येतो, असे म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे आणि महायुतीला मोठं यश मिळत आहे. देवेंद्र फडणवीसांचा विजय झाला असून भाजपला 127, शिवसेनाला 55 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 35 जागांवर आघाडी आहे. काँग्रेसला 20, शिवसेना उद्धव गटाला 16 आणि शरद पवार यांच्या गटाला 13 जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी वक्तव्य करत सांगितले की, देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. हा कल महायुतीच्या विजयाचे संकेत मानले जात आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती