सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • ७ डिसेंबर पासून राज्याचे हिवाळी अधिवेशन
  • एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
  • देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ
 विश्लेषण

महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद तापला; कर्नाटक पोलिसांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना अडवलं

डिजिटल पुणे    09-12-2024 17:56:46

कर्नाटक  : बेळगावात आज महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली. मात्र, कर्नाटक पोलिसांनी ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील हा कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांची अटक महत्त्वाची ठरते. सीमाभागातील तणाव वाढू नये यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना आज बेळगावात बंदी आहे.

सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बेळगाववर आपला दावा अधिक घट्ट करण्यासाठी कर्नाटक सरकार २००६ पासून बेळगावात विधिमंडळाचे अधिवेशन घेते. हे अधिवेशन बेकायदा असल्याचा आरोप करत महाराष्ट्र एकिकरण समितीने दरवेळेला महामेळावा आयोजित करून प्रत्युत्तर दिले आहे. यंदाही महाराष्ट्र एकिकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या महामेळाव्यासाठी कोल्हापूर येथून ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक आज सोमवारी (दि.९) बेळगावच्या दिशेने चालले होते. दरम्यान, शिवसैनिकांना कोगनोळी येथील दुधगंगा नदीजवळ कर्नाटक पोलिसांनी रोखले. आम्हाला बेळगावात जायचे आहे. आम्हाला कोणी रोखू शकत नाही, असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला. या शिवसैनिकांत संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे बेळगाव सीमेवर तणाव होता.

बेळगावात आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांना फरफटत नेत ताब्यात घेतले. तर दुसऱ्या बाजूला कोल्हापुरात शिवसैनिकांनी कर्नाटकातून येणाऱ्या गाड्या अडवल्या. तर दुसऱ्या बाजूला कोल्हापुरात शिवसैनिकांनी कर्नाटकातून येणाऱ्या गाड्या अडवल्या. यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी कोगनोळी टोल नाक्यावर कोल्हापुरातील शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे. कर्नाटक पोलिसांनी कितीही दडपशाही केली तरी कोणत्याही परिस्थितीत आम्ही बेळगाव मध्ये जाणार, असा पवित्र शिवसेना उपनेते संजय पवार आणि विजय देवणे यांनी घेतला आहे.

सोमवारी सकाळी १० वाजता बाईक रॅली काढत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते बेळगावमध्ये दाखल झाले. बेळगावात आज कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सीमाभागात देखील बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय. त्यामुळे याठिकाणी आता वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. मराठी भाषिकांवर अन्यायाची परीसीमा सरकारने गाठली आहे. जोपर्यंत महाराष्ट्रात सामील होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा कायम ठेवणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

दरम्यान, कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी म. ए. समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याची धास्ती घेत रविवारी (दि. ८) बेळगाव शहर पोलिस आयुक्तांनी शहरातील पाच ठिकाणी सोमवारी (दि.९) सकाळी ६ ते २० डिसेंबरच्या मध्यरात्री १२ पर्यंत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. समितीचा महामेळावा होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून प्रचंड दडपशाही करण्यात येत असून, या विरोधात लोकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती