सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 जिल्हा

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी... पुणेकरांना मिळकतकरात मिळणारी ४० टक्क्यांची सवलत कायम राहणार - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

डिजिटल पुणे    18-03-2023 09:31:16

मुंबई : आज पुणेकरांसाठी आनंदाचा दिवस आहे. पुणेकरांना मिळकतकरात मिळणारी ४० टक्क्यांची सवलत कायम ठेवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत निर्णय झाला. या निर्णयाबद्दल एकनाथजी आणि देवेंद्रजींचे पुणेकरांच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनापासून आभार मानले.

चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले कि, आज पुणेकरांच्या दृष्टीने फार मोठा निर्णय सरकारने केला. पुणे महानगर पालिकेमध्ये ५० वर्षांपूर्वी म्हणजे १९७० सालापासून प्रॉपर्टी टॅक्समध्ये ४० टक्के सूट देण्याचा असा एक नियम होता. २०१९ साली अचानक ऑडिट निघालं कि हे तुम्ही कुठल्या आधारे देत आहात. हे बंद करा. परंतु आपलं शासन आल्यानंतर पहिल्यांदा आपण या वसुलीला बंदि केली. आणि आज या शासनाने असा निणर्य घेतला कि, हि जी ४० टक्के सवलत पुणे महानगर पालिकेमध्ये ७० पासून प्रॉपर्टी टॅक्स मध्ये जी ४० टक्के सूट होती ती पुढे कंटिन्यू राहील. त्यामुळे पुणे महानगरपालिकेत राहणारे सर्व नागरिक धास्तावले होते कारण नवीन वर्षाची बिल येताना त्याबिलामध्ये या ४० टक्क्याची ऍडिशन येत होती. आज हा निर्णय झाला. आता सविस्तर प्रस्ताव लवकरच येईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

आज आणखी एक महत्वपूर्ण निर्णय झाला. आज पुणे महानगर पालिकेतील पीएमपीएल हि केवळ पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोनच शहरांना उपयोगी ठरते असे नाही. तिचे खूप रूट आहेत. ती तोट्यात चालल्यामुळे याची भाडेवाढ करावी याचा विचार झाला होता. हि वाढ आम्हाला मान्य नव्हती. पीएमआरडीएच्या खूप रूट्सवर पीएमपीएल येत होती. त्यामुळे त्यांनी पीएमपीएलच्या त्रुटीमध्ये काँट्रीब्युट करावं असा प्रस्ताव होता. पीएमआरडीएचे कमिश्नर आता पीएमपीएल ला डायरेक्टर असतील असा निर्णय झाला. यामुळे पीएमपीएलच्या आगामी काळात भाडेवाढ होण्याची शक्यता कमी असेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.


 तुमची प्रतिक्रिया जाहिराती