*लोकशाही पेक्षा एकाधिकार शाही वर केंद्रातील भाजपची जास्त भिस्त असल्याने कँटोन्मेंट निवडणुका लांबणीवर: मुकुंद किर्दत, आप*
पुण्यातील कॅन्टोन्मेंट व खडकी या दोन्ही ठिकाणच्या निवडणुका काल अचानक रद्द झाल्या आहेत.
दोन वर्षापेक्षा अधिक काळ या ठिकाणी निवडणूक न झाल्यामुळे नागरिकांच्या अनेक समस्याना उत्तरे मिळत नाहीत, तसेच सर्व कँटोन्मेंट बोर्ड ला निधी कमतरता ही मोठी समस्या आहे. त्यामुळे अनेक विकास कामे रखडली आहेत. त्यावर आवाज उठवला जात नाही. यातील काही रहिवासी भाग महानगरपालिकेला जोडले जाणार अशी चर्चा अनेक वर्षांपासून आहेत . परंतु त्याबाबत निश्चित असे धोरणात्मक निर्णय घेतले जात नाहीत. त्यामुळे खडकी सारखे कँटोन्मेंट बोर्ड मध्ये तर लोकसंख्या कमी होत चाललेली दिसते आहे. जुन्या इमारतींचे बांधकाम रखडलेले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालय याबाबतीत अत्यंत ढिसाळ असल्याने आणि आता लोक प्रतिनिधी नसल्याने जनतेच्या समस्या सुटत नाहीत, निर्णय घेतले जाात नाहीत. रहिवासी परिसर विलीनीकरण लवकर करा अन्यथा निवडणुका घ्यव्यात, याबाबत केंद्र सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आम् आदमी पार्टी करीत आहे.