सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 विश्लेषण

पुणे पोलीस दलात खळबळ! पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

डिजिटल पुणे    26-05-2023 15:39:34

पुणे : पिंपरी-चिंचवड येथील पोलिस  स्टेशनमध्ये कार्यरत असणारे पोलिस अंमलदार विशाल माने यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. गुरुवारी सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

विशाल माने यांची गुरूवारी साप्ताहिक सुट्टी होती. तेव्हा ते आपल्या काही मित्रांसह बाहेर फिरण्यासाठी गेले होते. यानंतर ते घरी परतले. आपल्या आईवडिलांशी बोलले. यानंतर ते आपल्या रूममध्ये गेले आणि त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. विशाल यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी आणि मुलं असा परिवार आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 


 तुमची प्रतिक्रिया जाहिराती