पुणे :जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'तेर पॉलिसी सेंटर ' या पर्यावरण संवर्धन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या पुणे स्थित संस्थेने ' एन्व्हायरॉथॉन - रन फॉर एन्व्हायर्नमेंट ' हा उपक्रम आयोजित केला असून ५०० हुन अधिक पर्यावरण दूत,नागरिक सहभागी होणार आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस हॉकी ग्राउंड(पाषाण) वरून जागतिक पर्यावरण दिवसाच्या एक दिवस आधी म्हणजे ४ जून ला रविवारी पहाटे ५ वाजता एन्व्हायरॉथॉन सुरु होईल. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा संचालक महादेव कसगावडे , पुणे ग्रामीण पोलीस सहायक अधीक्षक मितेश घट्टे , आयर्न मॅन हेमंत परमार व थिस ग्रिड्झ हे खास जर्मनी हुन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत .तेर पॉलिसी सेंटर च्या संस्थापक डॉ .विनिता आपटे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ही फक्त स्पर्धा नसून पर्यावरण जागृती साठी चा जागर आहे . या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे.
यावर्षी पुणे ,दौंड ,मुंबईसह ,कर्नाटक , आसाम , दिल्ली ,हरियाणा ,येथून अनेक पर्यावरणप्रेमी स्पर्धक सहभागी होणार आहेत . स्पर्धा १२ ते १८ ,१९ ते ४० ,४१ ते ५५ व ५६ पेक्षा जास्त अशा गटानं मधून घेण्यात येणार आहे . तीन ,पाच आणि दहा किलोमीटर साठी होणार आहे . १०कि मी साठी रोख पारितोषिक व पाच व ३ कि मी साठी आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत . नांव नोंदणी ३१ मे २०२३ पर्यंत करता येईल . अनेक कंपन्यां
चे मोठे
गट सहभागी होणार आहे
त . या स्पर्धेत जितके लोक सहभागी होतील तितकी झाडे दरवर्षी 'तेर पॉलिसी सेंटर ' कडून डोंगरांवर लावली जातात
,हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. नाव नोंदणीसाठी ९८३४३०५१२५ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा
[email protected].com या ईमेलवर करावी ,असे आवाहन करण्यात आले आहे.
जागृती आणि संवर्धनासाठी उपक्रम
तेर पॉलिसी सेंटर ही संस्था जंगल वाढविणे , विहिरींचे पुनरुज्जीवन करणे , पर्यावरण शिक्षण व पर्यावरण जागृती साठी प्रयत्नशील असणारी संस्था . संस्थेने आजपर्यंत पुण्यासह महाराष्ट्र ,गुजराथ ,कर्नाटक ,आसाम ,भुवनेश्वर ,गोवा ,राजस्थान इथे विविध ठिकाणी तीन लाखापेक्षा जास्त वृक्ष लावून त्यांची जोपासना केली आहे . संस्थेच्या सर्वच उपक्रमांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो ,कॉर्पोरेट कंपन्या मदत करतात त्यामुळे कामाचा उत्साह वाढतो ,असे तेर पॉलिसी सेंटर च्या संस्थापक डॉ .विनिता आपटे यांनी सांगितले.