सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 शहर

महाड मधील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते पक्षासोबत एकनिष्ठ

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    26-05-2023 17:44:06

 उरण : काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असून सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे त्यामुळे नेते आपल्या स्वार्थासाठी कुठल्याही पक्षात गेले तरी कार्यकर्ते हे प्रामाणिक पणे पक्षासोबत असल्याचे महाड मधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी  सांगितले. ज्यांना काँग्रेस पक्षाने सर्व काही दिले तेच आपल्या स्वार्थापोटी पक्ष सोडून गेले परंतु काँग्रेस हि एक चळवळ आहे,  काँग्रेस पक्षाला इतिहास आहे,काँग्रेस पक्ष कधीही संपणार नाही अशी महाड काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे. जगताप कुटुंबीयांनी पक्ष सोडल्यानंतर पहिल्यांदाच महाड मधील प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आज रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या आदेशानुसार वरीष्ठ उपाध्यक्ष मिलिंदजी पाडगांवकर यांच्या  उपस्थितीत पार पडली. या बैठकी प्रसंगी मच्छिमार संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष मार्तंड नाखवा, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष अखलाख शिलोत्री, माणगाव तालुका अध्यक्ष  विलास सुर्वे, पंकज तांबे,ओबीसी सेल अध्यक्ष वैभव पाटील, जेष्ठ काँग्रेस नेते प्रदीप मेहता, डॉ.नरेंद्र सिंग, युवा नेते अफझल चांदळे, मजिद देशमुख, (ग्रा.प. सदस्य,) इम्तियाज जनाब, मकबूल कादरी, अयुब घोले, मुबशीर करबेलकर, डॉ. गोंडीवकर, महमद अली खतीब, अकीब घोले, अलफला देशमुख, एब्राहीम झमाने, नदिम देशमुख, मुज्जफर देशमुख, सैफ खतिब, सुभाष खोपकर  आदी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती