सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 शहर

अभिमानास्पद गोष्ट ! कित्येकवेळा रक्तदान, कॅन्सरग्रस्तांसाठी केले केसदान ; माणुसकी जपणारा 'हा' अवलिया कोण ?

डिजिटल पुणे    12-02-2024 11:55:02

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात राहुल सरोदे यांनी कॅन्सरग्रस्तांसाठी केसदान या संकल्पनेची दखल घेतली. त्यानंतर त्यांनी स्वतः हि मोहीम सुरु केली. अनेकांनी केसदान करुन या मोहीमेत सहभाग घेतला. आपण दान केलेल्या केसांचा वापर मुंबईस्थित टाटा हॉस्पिटल संलग्न मदत ट्रस्ट हि संस्था विग बनवण्यासाठी करणार असून ते विग कर्करोगाशी लढत असलेल्या केमोथेरपीत केस गळून गेलेल्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी उपलब्ध करून देत असतात असे राहुल सरोदे यांनी सांगितले. आपण समाजात जन्माला आलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो मग ते कोणत्याही स्वरूपात असो याच भावनेतून राहुल सरोदे यांनी पहिल्यांदा २७ जुलै २०१९, दुसऱ्यांदा ११ फेब्रुवारी २०२२ रोजी आणि आता तिसऱ्यांदा केसदान केले आहे. 

यावर राहुल सरोदे म्हणाले, 'हे सर्व करत असताना मला माझे कुटुंबीय व सहकारी मित्र परिवार यांचा खूप मोठा पाठिंबा मिळाला आणि त्यांचेच प्रेम मला माझ्या हातुन घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या कार्यास प्रेरणा देते आहेत. मी थेरगावातील पदमजी पेपर प्रॉडक्ट्स या कंपनीत कार्यरत असून परिवर्तन सोशल फाऊंडेशन, थेरगाव सोशल फाऊंडेशन च्या माध्यमातून नेहमीच कामगार व समाजिक क्षेत्रात अविरतपणे कार्यरत असून त्यामाध्यमातून आजतागायत ४५ पेक्षा जास्त वेळा रक्तदान तसेच ३ वेळा केसदान केले आहे तसेच यापूढे देखील आपल्या समाजसाठी काहीतरी चांगले करण्यासाठी मी नेहमीच  अविरतपणे प्रयत्नशिल राहील'.


 तुमची प्रतिक्रिया जाहिराती