सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

अभिनेता हार्दिक जोशीचे मोठ्या पडद्यावर आगमन ; लवकरच 'लॉकडाऊन लग्न' मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पुजा    12-02-2024 16:48:38

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली होती. या मालिकेमध्ये राणादाची भूमिका अभिनेता हार्दिक जोशीने साकारली होती. या मालिकेतूनच हार्दिक जोशी घराघरामध्ये पोहचला आणि त्याला खरी ओळख मिळाली. त्यानंतर हार्दिक जोशी अनेक चित्रपट आणि शोमध्ये दिसला. आता हार्दिक जोशी नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. हार्दिक जोशीच्या या चित्रपटाचे नाव आहे 'लॉकडाऊन लग्न' 

सुमित संघमित्र दिग्दर्शित  'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटात अभिनेता हार्दीक जोशी हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच या सिनेमा हार्दीक जोशी सोबत सुनील अभ्यंकर देखील पाहायला मिळणार आहे. या सिनेमाता हार्दीक जोशी आणि सुनील अभ्यंकर हे दोघेही काका पुतण्याच्या भूमिकेत दिसतील. लॉकडाऊन लग्न हा सिनेमा येत्या ८ मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अमोल कागणे प्रस्तुत "लॉकडाऊन लग्न" या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कागणे, अमोल कागणे, सागर पाठक यांनी केली आहे.सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अमोल गोळे यांनी चित्रपटाचं छायांकन केलं आहे. 

काही दिवसांपूर्वी हार्दीक जोशीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत त्याच्या या आगामी सिनेमाविषयी माहिती दिली आहे. अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये हार्दिक लग्नाचा पोषाख आणि फेटा बांधून लग्नासाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे. या पोस्टरसोबत हार्दिकने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जिममध्ये घडलो, प्रेमात पडलो, झाला सगळा घोटाळा... सुखासुखी पार पडेल का हार्दिकचा लग्नसोहळा ? लॉकडाऊन लग्न ८ मार्च रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!' तसेच त्याच्या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावर करत उत्सुकता देखील दाखवली आहे. त्यामुळे हार्दीकचा हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

 

.


 तुमची प्रतिक्रिया जाहिराती