सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर विश्वजीत कदम यांची पहिली प्रतिक्रिया ; ' मी आजही काँग्रेस मधेच आहे, काँग्रेस सोडणार नाही'

पुजा    12-02-2024 17:46:52

मुंबई : राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर आता काँग्रेसमध्ये सुद्धा राजीनामास्त्र सुरु झालं आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते  अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. चव्हाणांनी मात्र आपण कुठल्याच पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचं म्हटलं आहे. 

दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्रातून अशोक चव्हाण यांच्या सोबत दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे सुपुत्र आणि आमदार विश्वजीत कदम सुद्धा जाणार अशी चर्चा राजकीय चर्चा रंगली आहे. मात्र, या सर्व चर्चा विश्वजित कदम यांनी फेटाळून लावल्या आहेत. विश्वजित कदम यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. "अशोक चव्हाण यांनी अचानक आमदारकीचा राजीनामा दिल्याची बातमी माध्यमांतून समजली. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या बातमीने मला वेदना झाल्या आहेत. परंतु वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चुकीचा गैरसमज पसरवला जात आहे, की विश्वजीत कदम यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला. परंतु मी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही." असं विश्वजीत कदम म्हणाले. 

"मी आजही काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून अजूनही काम करत आहे. ज्या पलूस कडेगावच्या जनतेने स्वर्गीय पतंगराव कदम यांना भरभरुन प्रेम दिलं, साथ दिली, इथल्या त्याच माता भगिनी, ज्येष्ठ आणि तरुणांनी मलाही सांगली जिल्हा आणि महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली. म्हणून माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनात त्यांना विश्वासात न घेता मी कोणताही निर्णय घेणार नाही. कुठलाही गैरसमज पसरवू नये" अशी विनंती विश्वजीत कदम यांनी केली.


 तुमची प्रतिक्रिया जाहिराती