सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • समरजीतसिंह घाडगे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेटल
  • पुणे मेट्रो आज सायंकाळी ६ पर्यंतच
  • आर आर आबांनी माझा केसाने गळा कापला :अजित पवार
 शहर

डॉ. पी.ए. इनामदार यांना टीडीएफ चा जीवनगौरव पुरस्कार प्रदान

डिजिटल पुणे    31-10-2024 13:00:12

पुणे: महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी संलग्न पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी(टीडीएफ) व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार डॉ.पी.ए.इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी.के.थोरात व पुणे विभाग टीडीएफचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 
 
सन्मानचिन्ह,मानपत्र,शाल श्रीफळ व  जी. के. थोरात लिखित 'तपस्वी' हे पुस्तक भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आला.यावेळी पुणे शहर  टीडीएफ चे अध्यक्ष प्रा. संतोष थोरात, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्राचार्य राज मुजावर, पुणे शहर जुनिyयर कॉलेज टीडीएफ चे अध्यक्ष प्रा. शशिकांत शिंदे, पुणे माध्यमिक सहkकारी  पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विजयराव कचरे, माध्यमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अशोक धालगडे, अमजद पठाण तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.पुणे शहरातील शैक्षणिक  क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन डॉ.पी.ए.इनामदार यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. हा कार्यक्रम दि.३१ ऑक्टोबर २०२४ रोजी आझम कॅम्पस येथे झाला. 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती