सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • समरजीतसिंह घाडगे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेटल
  • पुणे मेट्रो आज सायंकाळी ६ पर्यंतच
  • आर आर आबांनी माझा केसाने गळा कापला :अजित पवार
 शहर

भोर मतदारसंघातील ७० हजारचा धनगर समाज ठरवणार पुढील आमदार - भाऊसाहेब मरगळे

डिजिटल पुणे    31-10-2024 16:04:29

भोर-मुळशी - महाराष्ट्र विधानसभेच्या 203 भोर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया चालू असून या मतदारसंघात भोर मुळशी व राजगड या तीन तालुक्यांचा समावेश होतो 2024 मध्ये या मतदारसंघात एकूण चार लाख 21 हजार मतदार आहेत. हा मतदारसंघ महाराष्ट्रातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा व विखुरलेला मतदार संघ म्हणून ओळखला जातो, सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या डोंगरी भाग असलेल्या या मतदारसंघात सन 2011 च्या आर्थिक जातीनीहाय सर्वेनुसार एकूण 50 हजार धनगर मतदार होते. गेल्या पंधरा वर्षात त्यात वाढ होऊन 2024 मध्ये अंदाजे 70 ते 75 हजार मतदार आहेत असा दावा येथील काही कार्यकर्ते करतात आणि हेच मतदार विजयी उमेदवाराचे शिलेदार ठरू शकतात.

महाराष्ट्रात सध्या धनगर आरक्षणाचा मुद्दा जोरदार गाजत असून " र " व " ड " या दुरुस्तीच्या गोंधळात धनगर समाज स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे होऊन सुद्धा आरक्षणापासून वंचित आहे आज पर्यंतच्या सर्वच राजकीय पक्षांनी धनगर समाजाच्या अशिक्षित, अडाणी व एकीच्या अभावाचा गैर फायदा घेऊन समाजाची घोर फसवणूक केली आहे.  काँग्रेस प्रणित सरकारने पन्नास वर्षे सत्तेत असताना समाजाच्या मतांचा फायदा घेतला तर 2014 साली धनगर आरक्षणाच्या बारामती येथीलऐतिहासिक उपोषणाला भाजपचे तात्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून युतीचे सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असा शब्द दिला व समाजाने त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून युतीला मतदान केले व युती सरकार सत्तेत आणले. परंतु फडणसांनी युती सरकारने देखील समाजाची फसवणूक केली त्यामुळे समाजाचा ना महायुतीवर विश्वास, ना महाविकास आघाडीवर भरवसा म्हणून 2024 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील धनगर समाज वेगळ्या पावित्र्यात असून राज्यातनुकत्याच केलेल्या सर्वेनुसार 60 टक्के धनगर समाज बंडाच्या पावित्र्यात आहे.

 याचा फटका भोर विधानसभा मतदारसंघात देखील प्रस्थापितांना बसणार आहे कारण या मतदारसंघात काँग्रेसचे संग्राम थोपटे हे सलग तीन वेळा अतिशय थोड्या मताधिक्याने निवडून आले गेले आहेत परंतु सबंध भोर राजगड व मुळशी तालुक्यातील अनेक धनगरवाडे हे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. सर्व घरांमध्ये ना अजून वीज पोहचली आहे ,ना पाण्याची हरघर जल योजना,जलजीवन जलमिशन पोहोचवण्यात ते यशस्वी झाले,रस्ते नसल्यामुळे अनेक मैलोनमैल समाजाला दऱ्याखोरात पायपीट करावी लागत आहे, तर शिक्षणाच्या योग्य त्या सुविधा नसल्यामुळे शालेय मुलांना देखील दररोज अनेक किलोमीटर पायपीट करावी लागते हे वास्तवआजही आहे म्हणून आम्ही किती पिढ्या अजून मागास राहायचे, आमच्या अनेक पिढ्या अशिक्षित पणात गेल्या आता आमची मुले शिकू लागली आहेत असे येथील जेष्ठ मंडळी सांगतात त्यामुळे आमच्या समस्या सोडवण्यासाठी  आम्हालाच पुढे यावे लागेलम्हणून या मतदारसंघात आमचे 70 हजाराहून अधिक मतदान असताना देखील आम्हाला ग्रामपंचायत सदस्य, फार तर सरपंच वगळता पंचायत समिती व जिल्हा परिषद मध्ये कोठेही प्रतिनिधीत्व करण्याची संधी  मिळालेली नाही, म्हणून आम्ही आमचा प्रतिनिधी थेट विधानसभेत पाठवणार असून याबाबत नुकतीच भोर मुळशी राजगड मधील धनगर समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये 203 भोर विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजाचे एकमेव सुशिक्षित,अभ्यासू उमेदवार वेगरे गावचे माजी सरपंच भाऊसाहेब मरगळे यांना सर्व समाज बांधवांनी तन-मन-धनाने जाहीर सर्वानुमते पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय झाला आहे.त्यामुळे आता नको युती, नको आघाडी, नको ती तिसरी आघाडी, आम्हाला हवी आमची स्वतःची धनगर आघाडी अशी येथील तरुण कार्यकर्त्यांची भावना आहे.

 याबाबत उमेदवार भाऊ मरगळ यांच्याशी संपर्क झाला असता त्यांनी सांगितले की मी प्रस्थापितां विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत असून राज्यातील ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया, छत्रपती शासन इत्यादी सह अनेक छोट्या छोट्या नोंदणीकृत राजकीय पक्षांचा व मयक्रो ओबीसी समाजाचा मला जाहीर पाठिंबा असून,  वंचित बहुजन आघाडी, रासप व महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना या सर्व प्रमुख पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील असून लवकरच त्यांचे पाठिंब्या चे पत्र मला मिळेल अशी खात्री आहे, त्यामुळे या परिवर्तनाच्या लढाईत आपण सर्वांनी सहभागी होऊन एक वेळ मला साथ देऊन काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन मतदारांना केले आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती