पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निवडणुक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रहमधील लेख्यांची तपासणीच्या तरतूदीनुसार पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरिक्षक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील कै. बाबुराव सणस मैदान, सारसबाग जवळ, पुणे येथील निवडणूक खर्च नियंत्रण कक्षात खर्च तपासणी करण्यात येईल. ही तपासणी तीन टप्प्यात होणार असून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी 9 नोव्हेंबर रोजी तर दुसरी 13 नोव्हेंबर रोजी तर तिसरी तपासणी 17 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 12. 30 वाजता होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय मनोजकुमार खैरनार यांनी दिली आहे.