सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • ७ डिसेंबर पासून राज्याचे हिवाळी अधिवेशन
  • एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
  • देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ
 शहर

पीएमपीएलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केला मतदानाचा हक्क बजावण्याचा निर्धार

डिजिटल पुणे    31-10-2024 18:16:31

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये स्वत:सह कुटुंबाला देखील मताधिकार बजावण्यासाठी पुढाकार घेऊन हक्क बजावण्याचा निर्धार पीएमपीएलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केला. 

विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून आपला सहभाग नोंदवावा, यासाठी २१२ पर्वती विधानसभा मतदारसंघाच्यावतीने स्वीप कार्यक्रमाअंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात पीएमपीएलचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. 

या जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालिका दिपा मुधोळ-मुंडे, सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार यांच्यासह सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजाविण्याचा निर्धार व्यक्त करून मतदानाची प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी पर्वती विधानसभा मतदारसंघातील मतदान जागृती कार्यक्रमाची स्वीप पथक उपस्थित होते. 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती