सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • ७ डिसेंबर पासून राज्याचे हिवाळी अधिवेशन
  • एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
  • देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ
 शहर

पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयास निवडणूक निरीक्षक व खर्च निरीक्षकांची भेट

डिजिटल पुणे    31-10-2024 18:18:36

पुणे : भारत निवडणूक आयोगाकडून 212 पर्वती विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून संजीव कुमार यांची तर खर्च निरीक्षक म्हणून उमेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देवून निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी दिली.  

निवडणूक निरीक्षक श्री. संजीव कुमार आणि खर्च निरीक्षक श्री. उमेश कुमार यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील नामनिर्देशन प्रक्रियेची पाहणी करून समन्वय अधिकारी यांच्याकडून निवडणूक कामकाजाची माहिती घेतली.  तसेच  पर्वती विधानसभा मतदारसंघात स्थापन केलेल्या सर्व कक्षांची पाहणी करून कक्षनिहाय भेट देवून माहितीदेखील घेतली.

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती