सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 जिल्हा

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार; मुंबईकरांना काय मिळणार?

डिजिटल पुणे    04-02-2025 15:32:23

मुंबई-आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना या बजेटमधून नेमकं काय मिळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार असून मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी हे पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडणार आहेत.

मागील वर्षात तुलनेत पाच ते दहा टक्क्यांनी यावर्षी बजेटमध्ये वाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत विविध योजना आणि सुविधांसाठी तरतूद या अर्थसंकल्पात असेल अशी माहिती मिळत आहे.त्यामुळे आता अर्थसंकल्पातून कोणत्या घोषणा करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून अर्थसंकल्पात काय नेमकं विशेष मांडण्यात येतं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती