उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे दोन मालगाड्यांमध्ये जोरदार धडक झाली. एक मालगाडी ट्रॅकवर थांबलेली असताना, मागून आलेल्या दुसऱ्या मालगाडीने तीला जोरदार धडक दिली. या अपघातात पुढील मालगाडीचा इंजिन आणि गार्डचा डबा ट्रॅकवरून खाली कोसळला.या अपघातात दोन्ही गाड्यांचे लोको पायलट गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (DFC) वर घडला. या मार्गावर फक्त मालगाड्याच धावतात, त्यामुळे प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर याचा कोणताही परिणाम झाला नाही. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.
ही टक्कर इतकी भीषण होती की मालगाडीचे इंजिन आणि गार्डचा डबा रुळावरून घसरला. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.लोको पायलटना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ट्रॅक साफ केला जात आहे. खागा कोतवाली परिसरातील पंभीपूरजवळ हा अपघात झाला.DFCCIL ट्रॅकवर सिग्नल नसल्याने पहिल्या मालगाडीला मागून दुसऱ्या मालगाडीने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण कोळसा रुळावर विखुरला.
अपघातामुळे रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे. अनेक गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
दोन्ही लोको पायलटांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू असून ट्रॅक साफ करण्याचे काम सुरू आहे. हा अपघात कानपूर-फतेहपूर दरम्यान खागा येथे पांभीपूरजवळील अप लाईनवर झाला.
DFC अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ट्रॅकवर रेड सिग्नल होता, त्यामुळे एक मालगाडी थांबलेली होती. मात्र, मागून भरधाव आलेल्या दुसऱ्या मालगाडीने तिला धडक दिली. दोन्ही गाड्यांमध्ये कोळसा भरलेला होता. या अपघातामुळे फ्रेट कॉरिडॉरच्या एका मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून अनेक मालगाड्या थांबवण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
सिग्नल नसल्यामुळे एक मालगाडी रुळावर उभी होती, तेव्हा मागून दुसऱ्या मालगाडीने तिला धडक दिली. ट्रेनमध्ये कोळसा भरलेला होता. अपघातानंतर, ट्रॅकवर कोळसा विखुरला होता. ही टक्कर इतकी जोरदार होती की ट्रेनचे इंजिन रुळावरून घसरले.
DFC चे AGM जोगिंदर सिंग घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, या अपघाताची चौकशी सुरू असून प्राथमिक तपासात मानवी चूक (ह्यूमन एरर) असल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणजेच, पायलटच्या चुकीमुळे हा अपघात झाला आहे. कोणतीही मोठी हलगर्जीपणा झालेली नाही. सध्या बचावकार्य सुरू असून ट्रॅक लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ट्रॅक दुरुस्त होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. अप लाईनवर अनेक मालगाड्या थांबलेल्या असून काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.
पायलटने रेड सिग्नल पाहिले नाही?
DFCच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, मागून येणाऱ्या मालगाडीने रेड सिग्नल पाहून थांबणे आवश्यक होते. मात्र, पायलटने रेड सिग्नल पाहिले नाही किंवा त्याची दखल घेतली नाही. त्यामुळेच समोर थांबलेल्या ट्रेनला जोरदार धडक बसली.