सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 जिल्हा

रेडीओ क्लब येथील नवीन जेट्टीचे मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते भूमीपूजन

डिजिटल पुणे    13-03-2025 15:32:35

मुंबई : रेडीओ क्लब येथील प्रवासी जेट्टी, टर्मिनल इमारतीचे भूमीपूजन बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य अभियंता सुरेंद्र टोपले, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे आदी उपस्थित होते.

 

‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील अस्तित्वातील जेट्टीवरील सुविधा प्रवाशांकरीता अपुरी पडत असल्याने वृद्ध व्यक्ती, स्त्रीया व लहान मुले यांना अडचणी निर्माण होतात. या प्रस्तावित जेट्टीमुळे गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

 

अशी असणार जेट्टीटर्मिनल इमारत

 

80 मीटर बाय 80 मीटर, 350 लोकांची क्षमता असलेले ॲम्पीथिएटर, बर्थिग जेट्टी, अप्रोज जेट्टी, अग्नीसुरक्षा प्रणाली, सीसीटीव्ही यंत्रणा, गार्डनिंग व सुशोभीकरण. या कामाच्या ठिकाणी भूगर्भ चाचणी करण्यात आली आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती