*व्यवस्थापन ताणतणावाचे *
आजच्या या स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्ती आपलं अस्तित्त्व टिकवण्यासाठी धडपडतोय.प्रत्येकाला आपल अस्तित्त्व निर्माण करायचं परंतु हे करत असताना त्या प्रत्येक व्यक्तीला प्रचंड ताणा मधून जावे लागते.
हा ताण म्हणजे नेमकं काय शारीरिक व मानसिक वस्तुस्थिती विस्कळीत करून त्याला धोका निर्माण करणाऱ्या परिस्थितीत होणाऱ्या सामान्य जैविक आणि वार्तनिक प्रक्रिया म्हणजे ताण होय.काही वेळा काय होते अशा घटनांना सामोरे जात असताना समस्यांना तोंड देत असताना आपल्या क्षमता काही वेळा कमी पडतात त्यावेळी आपल्यावर ताण येतो.
यामध्ये प्रामुख्याने सगळ्यात जास्त प्रमाणात महिलांना या समस्येला तोंड द्यावे लागते. यामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कौटुंबिक बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते.या स्त्रिया कोणत्या गोष्टींचा तणाव घेतील ते सांगता येत नाही. पुरुषांच्या तुलनेने त्या जास्त संवेदनशील असतात. 'बाईपण भारी देवा' म्हणाऱ्या या लोकांना सांगावेसे वाटते जितकं हे बाईपण भारी वाटत तितकेच ते नाना विविध समस्यांनी जखडलेले आहे. कामवाली बाईचं आली नाही, आलं टेन्शन.मुलांची स्कुल बस आली नाही, आलं टेन्शन.एवढच काय तर गालावर येणारा पिंपल च ही टेन्शन घेतो आम्ही स्त्रिया, हा झाला विनोदाचा भाग. परंतु वास्तविक पाहता खरंच स्त्रियांना खूप तणाव मध्ये जगावे लागते.
महिलांना आर्थिक तणावाणां ही सामोरे जावे लागते.मुलांची शाळा. क्लासची फी असेल,ती भरताना होणाऱ्या आर्थिक अडचणी मूळे येणारा ताण असेल.घरातील वाण सामान भरताना एखाद्या प्रतिकुल परिस्थितीत वावरणाऱ्या स्त्रीची होणारी तगमग पुरुष आपल्या वर येणारा ताण चिडून , रागावून काढतात. तर काही पुरुष दारू पिऊन ताण विसरण्याचा प्रयत्न करतात.पण महिलांचे तसे नसते.त्यांना येणाऱ्या ताणाला त्यानांच सामोरे जावे लागते. अलीकडे मुलांच्या वाढणाऱ्या पालकांना गरजा ही पुरवताना त्या माता पालकांना मेनाकुटीला येते.
समाजामध्ये सामाजिक ताणण तणावांचा विचार करता समाजामध्ये वावरत असताना, ती केवळ स्त्री आहे म्हणून तिच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन न बदलतो, ऑफिस मध्ये काम करत असताना तिला मिळणारी वागणूक असो किंवा पुरुषी अहंकार असो. पुरुषांच्या पडणाऱ्या त्या वाईट नजरा या सर्व गोष्टींना तिला सामोरे जावे लागते.कधी कधी तर ती कोणापुढे व्यक्त ही होवु शकत नाही. आणि याच कारणामुळे ती नैराश्य मध्ये जावू शकते.
शैक्षणिक गोष्टी मध्ये ताण तणावाचा विचार केला तर शिक्षण घेत असताना आताच्या स्पर्धीमध्ये अव्वल स्थानावरती टिकुन राहण्यासाठी प्रत्येक जण कष्ट करत आहे. परंतु त्यामध्ये जर मनासारखे यश प्राप्त करता आले नाही तर ती महिला तणावा मध्ये जाते.एकतर मुलींना खुप कमी वेळ मिळतो शिक्षण घेण्या -साठी आणि स्वतःला सिध्द करण्यासाठी जर तिला त्यातही अपेक्षित असे यश मिळाले नाही तर ती नैराश्यात जाते जाते. यांचा परिणाम तिच्या स्वास्थ्यावर होतो.
थोडासा ताण चागंला असतो, तथापि दीर्घकालीन परिणाम ताण तुमच्या आरोग्यावर प्रतिकुल परिणाम करू शकतो ताणाचा सामना करण्यासाठी तुम्हाला ताणाचे व्यवस्थापन कसे करायचे हे शिकण्याची आवश्यकता आहे.
ताण व्यवस्थापन हा तुमच्या ताणावर नियंत्रण ठेवण्याचा एक मार्ग आहे, ज्यामुळे तुमच्या ताणावर तुमच्या जीवनावर होणारा त्याचा नकारात्मक परिणाम कमी होतो आणि गुणवत्ता सुधारते. ताण व्यवस्थापनाची पहिली पायरी म्हणजे ताणाची मुख्य कारणे ओळखणे एकदा तुम्हाला नेमके कारण प्रभावी मार्गानी कळले की, तुम्ही त्यावर उपचार करू शकता. ताण येण्याची काही सामान्य कारणे म्हणजे जास्त कामाचा ताण महिलांना समवयस्कांचा दबाव, कौटुंबिक संघर्ष, काळजी घेण्याच्या जबाबदाऱ्या पालकांच्या जबाबदाऱ्या आरोग्याच्या चिंता आणि आर्थिक समस्या
ताण व्यवस्थापन तंत्रांचे प्रकार -
केवळ कामाच्या ठिकाणीच ताण व्यवस्थापन नव्हे तर आपल्या जीवनातील सर्व पैलूंमध्येही संतुलन साधण्यास मदत करते.म्हणून व्यवस्थापनाचे महत्व दुर्लक्षित करता येणार नाही. येथे काही प्रभावी ताण व्यवस्थापन तंत्रे दिली आहेत.
योगा, जॉगिंग आणि अगदी श्वास घेण्याचे व्यायाम यासारखे व्यायाम ताण कमी करण्यास आणि तुम्हाला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यास मदत करू शकतात.ध्यान हा ताण कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. कारण तो तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यास आणि वर्तमानात जगण्यास मदत करतो. जेव्हा तुम्ही वर्तमानात जगता तेव्हा तुम्हाला भविष्यात काय घडेल आणि भूतकाळात काय घडले आहे याची कमी चिंता असते.
जर्नल लिहिणे हे एक उत्तम मार्ग आहे. कारण ते सर्व नकारात्मक भावनांना मुक्त करण्यास मदत करते. तुमचे विचार लिहिल्याने तुम्हाला तणाव कशामुळे निर्माण होत आहे. यावर एक दृष्टीकोन देण्यावा देखील मदत होते.जेव्हा तुम्ही तीव्र ताणतणावाचा अनुभव घेत असाल आणि स्वतःला त्याचा सामना करण्यास सक्षम नसाल तेव्हा थेरपी उपयुक्त ठरते. एक व्यावसायिक तुम्हाला आत्म: चिंतन करण्याम मदत करू शकतो आणि स्वतःवर परिणाम न करता तणावपूर्ण परिस्थिती कशी हाताळायची याचे मार्गदर्शन करू शकतो.
ताण व्यवस्थापनाचे फायदे
अनेक आरोग्य समस्या निर्माण करण्यासाठी ताण हा एक जोखीम घटक आहे. ताण व्यवस्थापित करण्यासाठी विविध तंत्राचा वापर केल्याने तुम्हाला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.हे तुमची उत्पादकता सुधारते कारण तुम्ही तुमच्या कामावर चांगले लक्ष केंद्रित करू शकता आणि व्यावसायिकदृष्ट्या आधिक व्यस्त राहू शकता. हे तुमच्या जीवनाची गुणवत्ता सुधारते कारण जेव्हा तुम्ही आधिक उत्पादक असता आणि कमी ताणतणाव असता तेव्हा त्याचे सकारात्मक परिणाम मिळतात. हे तुमचे एकुण आरोग्य सुधारते ताणतणाव - मुळे उच्च रक्तदाब,लवकर रजोनिवृत्ती, त्वचेची ॲलर्जी आणि मानसिक आरोग्य समस्या उद्भुव शकतात ताणतणावाचे व्यवस्थापन केल्याने तुम्हाला या सर्व आरोग्य समस्या टाळता येतात.कामाच्या आयुष्यातील संतुलन साधण्यासाठी हे पहिले पाऊल आहे. आणि कामाच्या आयुष्यातील संतुलनाचे फायदे तुम्हाला घेण्यास मदत करू शकते.
ताणतणाव हा बाहेरून दिसणारा आजार नाही त्याचे परिणाम अतिशय गंभीर आहेत ... म्हणजे बघा ना ताप आला तर तो वरून दिसतो पण स्ट्रेस ने आपण ग्रस्त असू तर अंतर्मनाला त्रास होतो पण आजुबाजुच्यांना दिसून येत नाही.
त्यामुळे हा प्रवास एकट्यालाचा करावा लागतो.
तणाव कमी करण्याचे मार्ग:
तणाव व्यवस्थापन -
आशावादी असणे
नियोजनपूर्वक कार्य करावे
संतुलित आहार - व्यायम
छंद मनोरंजन आवश्यक.
आध्यात्मिक पुस्तक वाचन
निसर्गरम्य वातावरणात मध्ये भटकंती करणे
जुन्या मित्र-मैत्रीणीशी भेटुन मनमोकळ्या गप्पा करणे
एखादया कला कौशल्याचा व्यवहारा मध्ये उपयोग करणे
जुने फोटो पाहणे.
कौटुंबिक आधार.
motivational भाषण ऐकणे.
सकारात्मक विचार करणे.
शांत राहून निर्णय घेणे.
शिक्षण आणि आर्थिक स्वालंबन
म्युझिक थेरपी
मानसिक धैर्य टिकवणे
स्त्रियानी स्वतःला आत्मनिर्भर करणे गरजेचे आहे.
व्यवस्थित वेळेचे नियोजन - जबाबदाऱ्या वाटून घेणे
"तणाव मुक्त जीवन आनंदी जीवन"
सौ. क्षितीजा संजय लोखंडे