सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • शेवटच्या क्षणी मुंबई काँग्रेसची मोर्चात एन्ट्री; होय नाही करत भाई जगताप व्होट चोर, गद्दी छोड घोषणा देत मोर्चात अवतरले!
  • राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवारांसह काँग्रेसचे प्रमुख नेते सत्याच्या मोर्चात सहभागी; सभास्थळी हजारोंची गर्दी
  • मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
  • हमाली करून कमावलंय, हरामाचा पैसा शिवणार नाही, हिंद केसरी खेळू नये म्हणून डाव, सिकंदरच्या वडिलांचा खळबळजनक आरोप
  • मतचोरीविरोधात महाविकास आघाडी एल्गार! राज ठाकरे मोर्चासाठी लोकलने दाखल
  • राज ठाकरे-उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचा आज मुंबईत मोर्चा
  • मुंबईत जय्यत तयारी झाली, पण ‘सत्याच्या मोर्चाला’ अद्यापही परवानगी मिळेना; विनापरवाना मोर्चा काढल्यास कारवाईचा इशारा
 व्यक्ती विशेष

महाराष्ट्रात डबल नव्हे ट्रिपल इंजिन सरकार हवे: '​​​​​​​स्थानिक'च्या निवडणुकीत विरोधकांचा सफाया करा, अमित शहांचा स्पष्ट संदेश

डिजिटल पुणे    27-10-2025 16:49:21

मुंबई :  केंद्रीय गृहमंत्रीअमित शहा यांच्या हस्ते आज महाराष्ट्र भाजपच्या येथील नव्या इमारतीचे भूमिपूजन झाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांसाठी पक्षाचे कार्यालय हे केवळ कार्यालय नव्हे तर मंदिर असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, महाराष्ट्र भाजप आपल्या नव्या इमारतीचे भूमिपूजन करून इतिहासात एक नवी सुरुवात करत आहे. आमच्या पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून आमच्यासाठी पक्ष कार्यालय हे मंदिर आहे. कार्यालयातच आमचे काम होते. कार्यालयातच आमच्या पक्षाचे सिद्धांत संवर्धित व संरक्षित होतात. कार्यालयातच आमच्या कार्यकर्त्याचे प्रशिक्षण होते. त्यामुळे इतर पक्षांसाठी पक्ष कार्यालय हे केवळ ऑफिस असू शकतो, पण भाजपसाठी ते मंदिरासारखे असते.

मुंबईत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या नव्या प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन पार पडले. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट संदेश दिला की, “महाराष्ट्रात डबल नव्हे, ट्रिपल इंजिन सरकार हवे!”

अमित शहा म्हणाले, “भाजपचे कार्यालय हे केवळ कार्यालय नाही, तर आमच्यासाठी मंदिर आहे. इथेच पक्षाचे संस्कार घडतात, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण होते आणि आमच्या विचारांचे संवर्धन केले जाते. इतर पक्षांसाठी कार्यालय हे ऑफिस असेल, पण आमच्यासाठी ते मंदिर आहे.”ते पुढे म्हणाले, “भाजपने नेहमीच सिद्धांतांच्या आधारे निती घडवली. देशहितासाठी आम्ही सतत संघर्ष केला. आता भाजप कोणत्याही कुबड्यांचा आधार न घेता स्वतःच्या बळावर उभे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप ही एक मजबूत स्वाक्षरी बनली आहे.”

५५ हजार चौरस फुटांच्या नव्या मुख्यालयात लायब्ररी, कॉन्फरन्स रूम, प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांचे कार्यालय अशी आधुनिक सुविधा असतील. “हे कार्यालय मुख्यमंत्र्यांना आठवण करून देईल की येथूनच विजय मिळवायचा आहे,” असे शहा म्हणाले.

शहा यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला की, “सध्या महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार आहे. पण मला ते पुरेसे नाही. मला ट्रिपल इंजिन सरकार हवे — केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आपले प्रशासन हवे. स्थानिक निवडणुकांमध्ये असे लढा की विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे. दुर्बिण लावूनही ते दिसता कामा नयेत.”ते पुढे म्हणाले, “भाजप हा देशातील एकमेव पक्ष आहे, जिथे बूथ प्रमुख देखील पक्षाध्यक्ष होऊ शकतो. आमचा पक्ष घराणेशाहीवर नव्हे तर कार्यावर चालतो. एका गरीब चहावाल्याचा मुलगा तीन वेळा पंतप्रधान होतो, हे आमच्या लोकशाहीवरील विश्वासाचे उदाहरण आहे.”2026 पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे कार्यालय उभारण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, “2014 मध्ये महाराष्ट्राला पहिला भाजपचा मुख्यमंत्री मिळाला. आता डबल इंजिन नव्हे, ट्रिपल इंजिन सरकार स्थापन करायचे आहे.”

सध्या महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार अस्तित्वात आहे. त्याचे तुम्हाला समाधान असेल, पण मला नाही. मला डबल इंजिन नव्हे तर ट्रिपल इंजिन सरकार हवे. जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत व नगर परिषदांतही आपले प्रशासन हवे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक मोठ्या ताकदीने लढवून विरोधकांचा सफाया करावा. दुर्बिणीनेही ते दिसणार नाहीत एवढ्या ताकदीने आपल्याला ही निवडणूक लढायची व जिंकायची आहे. देशाची जनता भाजपच्या स्वागतासाठी तयार आहे, असेही अमित शहा यावेळी बोलताना म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी 2014 च्या निवडणुकीची आठवण करून दिली. आम्ही युतीचा प्रयत्न केला. निवडणूक स्वतंत्र लढलो. महाराष्ट्राला पहिला भाजपचा मुख्यमंत्री मिळाला. त्यानंतर तीनवेळा आम्हाला बहुमत मिळाले. डबल इंजिन सरकार नको आहे. ट्रिपल इंजिन सरकार हवे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी असे लढावे की, विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे. दुर्बिण लावूनही सापडता कामा नयेत, अशी गर्जना देखील त्यांनी केली. 

 मुख्य ठळक मुद्दे :

मुंबईत महाराष्ट्र भाजपच्या नव्या मुख्यालयाचे भूमिपूजन

अमित शहा यांचा “ट्रिपल इंजिन सरकार”चा नारा

पक्ष कार्यालयाला मंदिराचा दर्जा

2026 पर्यंत सर्व जिल्ह्यांत भाजप कार्यालयाचे लक्ष्य

विरोधकांचा “सफाया” करण्याचे आवाहन


 Give Feedback



 जाहिराती