मुंबई : निवडणूक आयोगाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आज (1 नोव्हेंबर) मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढण्याची घोषणा केली आहे.तरी या मोर्चाला मुंबई पोलिसांनी आतापर्यंत परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आज 1 नोव्हेंबर रोजी होणारा हा मोर्चा विनापरवाना निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदारयाद्यांतील गोंधळ, दुबार नावे आणि कथित मतचोरीविरोधात हा मोर्चा निघणार असून, यात महाविकास आघाडी आणि मनसेने मतदार यादीतील गोंधळ, दुबार नावे, मतचोरी आणि निवडणुकांतील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात हा मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार, तसेच काँग्रेस व डाव्या पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत.
मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आज (1 नोव्हेंबर) एल्गार पुकारणार आहेत. महाविकास आघाडी आणि मनसे आज मुंबईत आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहे. सत्याचा मोर्चा असं या मोर्चाचं नामकरण करण्यात आलंय. या मोर्चाला उद्धव ठाकरे, राज ठाकरे , आदित्य ठाकरे, अमित ठाकरे उपस्थित असणार आहेत. आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत हा मोर्चा काढण्यात येत आहे. लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर यावं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. मोर्चा दुपारी 1 वाजता मुंबईतील फॅशन स्ट्रिटवरून सुरू होईल. मेट्रो सिनेमामार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबेल.
महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चात राज ठाकरेंची मनसेही सहभागी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज स्वतः मोर्चात चालणार आहेत. दादरहून सीएसएमटीकडे ते लोकलने प्रवास करणार आहेत. मोर्चाची वातावरण निर्मिती म्हणून राज ठाकरेंनी नुकताच रंगशारदा सभागृहात कार्यकर्ता मेळावा घेत मतदारयंत्र, मतदार याद्यांसंदर्भात प्रेझेन्टेशनही केलं होतं. तसंच मोठ्या संख्येने मोर्चाला उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी मुंबईकरांना केलं होतं.
परवानगी अद्याप नाकारली
दरम्यान, विनापरवानगी मोर्चा झाल्यास पोलीस कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आजच्या मोर्चानंतर आयोजकांवर गुन्हा देखील दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या मोर्चाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून विरोधक काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मोर्चाचा मार्ग
महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चात राज ठाकरेंची मनसेही सहभागी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज स्वतः मोर्चात चालणार आहेत. दादरहून सीएसएमटीकडे ते लोकलने प्रवास करणार आहेत. मोर्चाची वातावरण निर्मिती म्हणून राज ठाकरेंनी नुकताच रंगशारदा सभागृहात कार्यकर्ता मेळावा घेत मतदारयंत्र, मतदार याद्यांसंदर्भात प्रेझेन्टेशनही केलं होतं. तसंच मोठ्या संख्येने मोर्चाला उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी मुंबईकरांना केलं होतं.दुपारी एक वाजता हा मोर्चा फॅशन स्ट्रीट इथून निघेल आणि पुढे मेट्रो सिनेमा आणि त्यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयाकडे जाईल.
मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इथे स्टेज उभारण्यात आला आहे या ठिकाणी प्रत्येक पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची भाषण होतील.ज्यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार बाळासाहेब थोरात शेकाप जयंत पाटील व इतर काही महत्त्वाच्या नेत्यांची भाषणे होतील.राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारा विरोधात हा मोर्चा असणार आहे... मत चोरी, दुबार मतदार, मतदार यादीतील घोळ या सगळ्याची पुरावे राज्य निवडणूक आयोगाला देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हा मोर्चा काढण्यात येतोय.
राज्य निवडणूक आयोग एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम जाहीर करत असताना जोपर्यंत मतदार याद्या अपडेट केला जात नाहीत आणि हा घोळ संपूर्णपणे दूर केला जात नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, या मतावर विरोधक ठाम राहणार.या मोर्चानंतर हा मुद्दा अधिक आक्रमकतेने पुढे नेण्यासाठी उद्या सर्व पक्षांची मिळून अधिकृत भूमिका मांडली जाणार असल्याची माहिती आहे.
प्रमुख मागण्या
1. मतदारयाद्या अद्ययावत करा
2. दुबार नावे काढा
3. मतदारयाद्या सुधारल्याशिवाय निवडणुका लांबवा
4. ७ नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी सुरू ठेवा
संभाव्य कारवाई
विनापरवानगी मोर्चा निघाल्यास पोलिसांकडून कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. आयोजकांवर गुन्हे दाखल होऊ शकतात, अशी चर्चा आहे.
उपस्थित राहणारे प्रमुख नेते
शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नसीम खान, सचिन सावंत, संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि इतर अनेक नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत.
काँग्रेसमध्ये मतभेद
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी अध्यक्ष नाना पटोले या मोर्चापासून दूर राहणार आहेत. मनसेसोबतच्या संयुक्त सहभागावर काँग्रेसमधील काही नेते नाराज आहेत, कारण याचा परिणाम बिहार निवडणुकीत होऊ शकतो, अशी चर्चा आहे.‘सत्याचा मोर्चा’ हा विरोधकांचा निवडणूक आयोगाविरोधातला संयुक्त आंदोलनाचा प्रयत्न आहे. परवानगी नसतानाही मोर्चा होणार असल्याने आज मुंबईकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.