पंजाब : आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिंकदरचा सहभाग असल्याचा आरोप प्राथमिक दर्शनी तपासातून समोर आला आहे. राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध असल्याचे पोलिस तपासातून समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी सिकंदरच्या कुटुंबीयांना बोलण्यास नकार दिला असून खोट्या गुन्ह्यात आमच्या मुलाला अडकवलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सिकंदरच्या अटकेमुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूरच्या गंगावेश तालीममध्ये घडलेला आणि महाराष्ट्र केसरी जिंकणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख सध्या अडचणीत सापडला आहे. पंजाब पोलिसांनी त्याला शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे. सीआयए (CIA) पथकाने पपला गुर्जर गँगला शस्त्र पुरवणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड करत चार जणांना अटक केली असून त्यात सिकंदर शेखचाही समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे. प्राथमिक तपासात राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचे समोर आले आहे.
पंजाब पोलिसांच्या सीआयए (CIA) पथकाने शस्त्र तस्करी रॅकेटचा भंडाफोड केला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात सिकंदर शेखचाही समावेश आहे.पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 99 हजार रुपये, 5 पिस्तुलं, काडतुसे, स्कॉर्पिओ-एन आणि एक्सयूव्ही या दोन गाड्या जप्त केल्या आहेत.
या प्रकरणी पंजाबमधील खरड पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पपला गुर्जर गँगशी संबंध पंजाबचे एसएसपी हरमन हंस यांनी सांगितले की अटक आरोपी हरियाणा आणि राजस्थानमधील कुख्यात विक्रम उर्फ पपला गुर्जर टोळीशी थेट जोडलेले आहेत.हे आरोपी उत्तर प्रदेशातून शस्त्र आणून पंजाब आणि आसपासच्या भागात विक्री करत होते.तपासादरम्यान सिकंदर शेखचे नाव समोर आलं असून, त्याचा महाराष्ट्रातील गुन्हेगारी रेकॉर्ड तपासला जात आहे.
मुख्य आरोपी दानवीरवर गंभीर गुन्हे या प्रकरणातील मुख्य आरोपी दानवीरवर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये खून, दरोडा, एटीएम फोडणे आणि आर्म्स अॅक्टचे गुन्हे आहेत.२४ ऑक्टोबर रोजी दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे दोन पिस्तुलं घेऊन मोहालीत आले होते. ही शस्त्रं ते सिकंदर शेखकडे देणार होते. सिकंदरने ती कृष्ण उर्फ हॅप्पी नावाच्या व्यक्तीकडे पोचवायची होती.पोलिसांनी एअरपोर्ट चौकातून तिघांना अटक केली आणि २६ ऑक्टोबर रोजी हॅप्पीलाही पकडून त्याच्याकडून आणखी तीन पिस्तुलं जप्त केली,
महाराष्ट्र केसरी ते शस्त्र तस्करी सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालीमचा शिष्य असून आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळला आहे.तो आर्मीमध्ये क्रीडा कोट्यातून भरती झाला होता, मात्र नंतर नोकरी सोडली.बीए पदवीधर असलेला सिकंदर विवाहित असून, गेल्या काही महिन्यांपासून पंजाबमधील मुल्लांपुर गरीबदास येथे भाड्याच्या घरात राहत होता.पोलिसांच्या माहितीनुसार, सिकंदर शस्त्र तस्करी साखळीत मध्यस्थाची भूमिका बजावत होता.सिकंदरच्या कुटुंबीयांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला असला तरी त्यांनी एवढंच सांगितलं की,आमच्या मुलाला खोट्या प्रकरणात अडकवलं जात आहे.
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी 2023 च्या माती गटातील अंतिम लढतीत पंचाच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर, सिकंदर शेख याची महाराष्ट्रात चर्चा झाली होती. सोशल मीडियावर तर नेटकऱ्यांनी त्याला खांद्यावर घेतलं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांच्या निर्णयावर बोट ठेवत सिकंदरच्या बाजूने सोशल मीडियात खूप मोठे ट्रोलिंग झालं होतं. कुस्तीवरुन राज्यातील वातावरण तापलं होतं. त्यानंतर, पुढच्याच वर्षी सिकंदरने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2024 ची मानाची गदा पटकावली होती. तत्पूर्वीच, मी जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी असल्याचं त्याने म्हटलं होतं. पंढरपूरमध्ये बोलताना सिकंदर शेख यानं आपणच जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी असल्याचं सांगत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पराभवावर उत्तर दिले. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर जवळच्या भीमा साखर कारखान्यावर भीमा केसरी कुस्ती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे, तेव्हा सिकंदर शेखने पंढरपूरमध्ये हे वक्तव्य केलं होतं. मात्र, आज अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात त्याला अटक झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. .