मुंबई : मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आज (1 नोव्हेंबर) एल्गार पुकारला. महाविकास आघाडी आणि मनसे आज मुंबईत आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे, शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहे थोरात यांच्यासह मनसे आणि महाविकास आघाडीमधील अनेक नेते सहभागी झाले.
विरोधकांच्या सत्याच्या मोर्चात हजारो लोकांनी गर्दी केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार यांनी फॅशन स्ट्रीटपासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत पायी चालत सत्याच्या मोर्चात सहभाग नोंदवला. यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयासमोर सभा झाली. यासभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाषण करत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
आधी नावं वाचली, मग माणसं उभी केली, राज ठाकरेंनी नेमकं काय केलं?
सगळे बोलत आहेत दुबार मतदार आहेत. आम्ही बोलतोय, भाजपचे लोक बोलताय, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील लोक बोलताय...मग निवडणुका घ्यायची घाई का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. मतदार याद्या साफ करा, पारदर्शक याद्या केल्यावर यश-अपयश कोणाचं, हे स्पष्ट होईल, असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरेंनी सभेत दुबार मतदारांचा पुरावा देखील दिला. आज मी इकडे पुरावा घेऊन आलो आहे. दुबार मतदारांना घेऊन आलोय, असं म्हणत राज ठाकरे यांनी दुबार मतदारांच्या याद्यांच्या कागदपत्रांचा डोंगर दाखवला. यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार देखील पाहात बसले. राज ठाकरेंनी सभेसाठी उपस्थित असलेल्या माणसांमध्ये दुबार मतदारांच्या याद्यांची कागदपत्रं ठेवली होती. ही सर्व दुबार मतदार आहेत. जेव्हा कधी निवडणुका होतील तेव्हा याद्यांवर काम करा, प्रत्येक चेहरा समाजाला पाहिजे. दुबार-तिबार तिथे आले, तर तिथेच फोडून काढा आणि मग पोलिसांच्या ताब्यात द्या, असा सूचना राज ठाकरेंनी यावेळी दिल्या.
मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित दुबार मतदारांविरोधात आज महाविकास आघाडी आणि मनसेने मुंबईत "सत्याचा मोर्चा" काढला. या मोर्चात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार यांसह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले.
फॅशन स्ट्रीटपासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला आणि त्यानंतर सभेचे आयोजन झाले.
राज ठाकरेंचा ‘पुरावा’ दाखवण्याचा क्षण
सभेत भाषण करताना राज ठाकरे म्हणाले,
“सगळेच म्हणत आहेत दुबार मतदार आहेत – आम्ही, भाजपचे लोक, अजित पवारांचे लोकसुद्धा. मग निवडणुकीची एवढी घाई का? आधी मतदार याद्या साफ करा. पारदर्शक याद्या केल्यावर कोणाचं यश-अपयश स्पष्ट होईल.”
यानंतर राज ठाकरेंनी सभेतच दुबार मतदारांच्या याद्यांचे कागदपत्रांचे गठ्ठे दाखवले.
“मी पुरावा घेऊन आलोय. ही यादी पहा — हेच दुबार मतदार आहेत,” असे म्हणत त्यांनी कागदपत्रांचा ढीग दाखवला.
राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सूचनाही दिल्या —
“मतदानाच्या वेळी दुबार-तिबार लोक आले, तर त्यांना जागेवरच थांबवा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या.”
नव्याने सांगण्यासाठी काही नाही.
याआधीच अनेकवेळा बोललो आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल सगळ्यांचे आभार
सगळे बोलत आहेत दुबार मतदार आहेत.
भाजपचे लोक देखील तेच म्हणताय.
अजित पवारांची लोक म्हणायची दुबार मतदार आहेत.
मग निवडणूक घेण्याची घाई का?
मतदार याद्या साफ करा.
पारदर्शक याद्या केल्यावर यश अपयश कोणाच स्पष्ट होईल.
सगळं लपून छापुन सुरू आहे.
साडेचार मतदार कल्याण डोंबिवली मुरबाड आणि मधील मतदार यांनी मलबार हिल मतदार संघात देखील मतदान केल
राज ठाकरेंनीकडून यादी आणली.
लाखो लोक मतदानासाठी वापरले गेले.
आज दुबार मतदारांचा दुबार मतदार आणले.
कागदपत्रांच्या डोंगर दाखवला. हेच दुबार मतदार आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.
आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती
राज ठाकरेंच्या भाषणावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार व्यासपीठावर बसून ऐकत होते.
मोर्चाला महाविकास आघाडीच्या नेत्यांसह मनसेच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.