सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 विश्लेषण

पुणे जिल्ह्यातील गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाचा टक्का तीन ते साडेतीन टक्क्यांनी वाढला

डिजिटल पुणे    21-11-2024 13:32:06

पुणे : मागील पाच वर्षांत झालेला सत्ताबदल, नव्याने उदयास आलेली महाविकास आघाडी आणि महायुती, त्यातून रिंगणात असलेले सहा पक्षांचे उमेदवार व लाडकी बहीण योजना आदी कारणांमुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही लक्षवेधी ठरली. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभेच्या जागांसाठी बुधवारी शांततेत मतदान झाले. शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मिळून सरासरी ६१ टक्के मतदान झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाचा टक्का तीन ते साडेतीन टक्क्यांनी वाढला आहे.

मागील पाच वर्षात झालेला सत्ताबदल, नव्याने उदयास आलेली महाविकास आघाडी आणि महायुती, त्यातून रिंगणात असलेले सहा पक्षांचे उमेदवार व लाडकी बहीण योजना आदी कारणांमुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही लक्षवेधी ठरली. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभेच्या जागांसाठी बुधवारी शांततेत मतदान झाले. शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मिळून सरासरी ६१ टक्के मतदान झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाचा टक्का तीन ते साडेतीन टक्क्यांनी वाढला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, पुरंदर, बारामती, मावळ आणि आंबेगाव मतदार संघात सुमारे ७० टक्के मतदान झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक मतदान हे इंदापूर विधानसभा मतदार संघात झाले आहे. तर जुन्नर, खेड आळंदी, शिरूर, भोर या मतदार संघात ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. ग्रामीण भागातील दहा विधानसभा मतदार संघात मिळून सुमारे ६८ ते ६१ टक्के मतदान झाले आहे. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरातील ११ विधानसभा मतदार संघात मिळून सरासरी ५४ टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक भोसरी विधानसभा मतदार संघात ६० टक्क्याहून अधिक मतदान झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत (२०११) पुणे शहरासह जिल्ह्यातील ५७.६९ टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये सुमारे तीन ते साडेतीन टक्क्यांनी यंदा वाढ झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत मतदानाची आकडेवारी अंतिम करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू होते.

आजी-माजी मंत्र्यांसह मदारांचे भवितव्य

पुण्यासह जिल्ह्यातील २१ जागांसाठी प्रमुख राजकीय पक्षांसह ३०३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यामुळे चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत मतदार राजाने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे. यावरून चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान शनिवारी (ता. २३) मतमोजणी होणार असून त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी थेट काका-पुतण्यामध्ये लढत झाली. दिलीप वळसे-पाटील, चंद्रकांत पाटील, दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे, विजय शिवतारे या आजी-माजी मंत्र्यांसह आमदार संग्राम थोपटे, दिलीप मोहिते, सुनील शेळके, सजय जगताप आदी प्रमुख नेत्यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे


 लोकांच्या प्रतिक्रिया

Digital Pune
हरकचंद जैन
 21-11-2024 18:47:18

फतव्याचा परिणाम तरी अपेक्षित मतदान झाले नाही

 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती