पुणे :महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले होते. आज राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सध्या महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांचे कौल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळाली. या अटीतटीच्या लढतीत कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलात भाजप महायुतीने बाजी मारल्याचं चित्र दिसत आहे.
पुणे शहरातील कसबा पेठेतील विधानसभेची पोटनिवडणूक मागील वर्षी राज्यभर गाजली होती. मागील वर्षी झालेली पोटनिवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी यांनी प्रतिष्ठेची केली होती. पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना 13,625 मते मिळाली होती. हेमंत रासने यांना 200,40 मते मिळाली होती. आज कोण आघाडी घेणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.