सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 विश्लेषण

पुणेः हडपसरची परंपरा राहणार का कायम ?

डिजिटल पुणे    23-11-2024 11:38:36

पुणे  : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले होते. आज राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सध्या महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांचे कौल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळाली. या अटीतटीच्या लढतीत कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलात भाजप महायुतीने बाजी मारल्याचं चित्र दिसत आहे.

पुणे जिल्ह्यातील हडपसर हा एक विधानसभा मतदार संघ असून महत्त्वाचा मानला जाणारा मतदार संघ आहे. यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हडपसरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. हडपसरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात पडलेली फूट, त्यांची महायुती व महाविकास आघाडीमध्ये झालेली विभागणी या पार्श्वभूमीवर निवडणूक रंगली आहे. दरम्यान, या मतदार संघाच मतदारांनी प्रत्येक वेळी आपला लोकप्रतिनिधी निवडीची पुनरावृत्तीही टाळली असल्याने हीच परंपरा यापुढेही चालू राहणार का, हे पहावे लागणार आहे.राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार चेतन तुपे यांना ३२,२१२ ,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप यांना १९,६७० मनसे चे उमेदवार साईनाथ बाबर यांना ४,१०३ मते मिळाली आहे. या प्रतिष्ठेच्या लढाईत कोण बाजी मारणार हे आज कळणार आहे.राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार चेतन तुपे सध्या आघाडीवर आहेत.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती