सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 विश्लेषण

पुणेः पिंपरीत अजित पवार पक्षाचे आमदार आण्णा बनसोडे आघाडीवर

डिजिटल पुणे    23-11-2024 12:33:03

पुणेः महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले होते. आज राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सध्या महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांचे कौल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळाली. या अटीतटीच्या लढतीत कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलात भाजप महायुतीने बाजी मारल्याचं चित्र दिसत आहे.

पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या सुलक्षणा शिलवंत यांच्यासह १५ उमेदवार रिंगणात आहेत. २, ०२, ७६६ मतदारांनी ५१. ७८ टक्के मतदान केले आहे. अकराव्या फेरी अखेर ६३,१७० अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) - ३९,०५४ व सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार)- २०७७० आहेत. बनसोडे आघाडीवर आहेत ते १६०९६ मतांनी आघाडीवर आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती