सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 विश्लेषण

महायुतीचा विजय, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

डिजिटल पुणे    23-11-2024 12:48:29

मुंबई : शिवसेनेतील फुटीपासून महाविकास आघाडी कोसळणं आणि थेट शिवसेनेतील प्रबळ नेतृत्त्व असलेले एकनाथ शिंदे  भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्री पदी विराजमान होण्यापर्यंत अनेक हादरवणाऱ्या घटना महाराष्ट्रानं याची देही, याची डोळा अनुभवल्या. आता या सर्व धक्कादायक आणि अनाकलनीय घटनांनंतरची यंदाची पहिली विधानसभा निवडणूक पार पडत आहे. अशातच, आता मतदार राजाचा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे यंदा मतदार राजा सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महायुतीने विधानसभा निवडणुकीत २२२ जागांवर आघाडी घेतली आहे. आता महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी शक्यता वाटत आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिाय दिली असून महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मानले आहे. लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय होत आहे. तसेच मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना ते म्हणाले, संपूर्ण निकाल लागल्यानंतर आम्ही तीनही पक्ष एकत्र बसून पुढचा निर्णय घेऊ.

महायुतीला बहुमत मिळाले आहे. त्यावर मुख्यमंत्री एकना शिंदेंनी आनंद आणि आभार व्यक्त केले आहेत. 'लाडक्या बहीणींनी आम्ही केलेल्या कामाची पोहोच पावती दिली आहे. मी सर्व मतदारांना धन्यवाद देतो. माझ्या लाडक्यी बहीणींचेही मी आभार मानतो', असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदेंचा कोपरी पाचपाखडी येथून विजय झाला आहे. केदार दिघे यांचा पराभव झाला आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती