पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विविध श्रेणीनुसार मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो लोक या शर्यतीत सहभागी झाले होते. सर्वांनी आपापल्या शर्यती पूर्ण उत्साहात पूर्ण केल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे एसपीपीयू क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या 3 किमी मुलांच्या शर्यतीत सिया सदानंद स्वामीने पदक पटकावले.सॉफ्टवेअर अभियंता, आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक श्री सदानंद स्वामी, त्यांची मुलगी चिमुकली सिया वय 6 वर्ष हिने नांदेड सिटी पब्लिक स्कूल आयोजित 3 किमी मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक व पदक मिळवून यश संपादन केले आहे. ६ वर्षीय सिया सदानंद स्वामी ही नांदेड शहरातील रहिवासी आहे. ती नांदेड सिटी पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे. 3 किमी मुलांच्या शर्यतीत भाग घेऊन पदक जिंकले. यावेळी सियाने सांगितले की, तिला मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायला आवडेल. तिने आतापर्यंत अनेक मॅरेथॉन शर्यतींमध्ये भाग घेतला आहे