भाग ६६ पासून पुढे
शेवटी आम्ही केदारनाथच्या अंगणात प्रवेश केला. एक वेगळच सात्विक समाधान आम्हाला वाटलं. कुठे ठाणे नागपूर आणि कुठे केदारनाथ...!
आम्हीच स्वतःला खूपच भाग्यवान समजत होतो. आणि नशीब वान
सुद्धा!
वीस वर्षांपूर्वी मी बायको विजया आणि मुलगा केदारनाथ का आलो होतो... तेव्हाच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. अंगावर मूठभर मास वाढल्या सारखं वाटलं. खूपच आनंद झाला. यात्रेकरूंसाठी सरकारने सुद्धा राहण्याची सोय केली होती. त्यातच आम्हाला रूम मिळाली. आमचे सामान ठेवले. चहा पाणीही झाले. सर्व मरगळ निघाली. उत्साह, चैतन्य,प्रसन्नता वाटली. कितीतरी घटना मागील वीस-पंचवीस दिवसात घडल्या होत्या.
सर्व रहाण्याची आणि जेवणाची सोय झाल्यानंतर फेरफटका मारायला बाहेर पडलो... आजूबाजूचा परिसर पाहिला. मन प्रसन्न झालं. खूप बरं वाटलं.
इथं मात्र माझ्या कॅमेरा खूपच बिझी होता. काय पाहू आणि काय नाही अशी विचित्र अवस्था मनाची झाली होती... त्यातून बनण्याची थंडी होती. दूरवर बर्फ पसरलेले होते.. ते स्पष्ट दिसत होते..
मला तर मजा वाटली. मोहन केळकर आणि अनुपमा देवधर सुद्धा खुश होते. आमच्या चालण्याचे सार्थक झाले होते
त्याचा आनंद आमच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. एक मोठ दिव्य केल्यासारखं वाटत होतं.... पण इथं सांगणार कुणाला ? आणि कशासाठी सांगायचं ? असो...
आम्ही नतमस्तक झालो!
परमेश्वराचे आभार मानले.
केदारनाथ मंदिरासमोरील
नंदी
चे दर्शनही घेतले...
शिवाय रात्रीच्या वेळी केदारनाथ मंदिर रोषणाईने झगमगलेल सुद्धा पहायला मिळालं... एक वेगळाच अनुभव होता तो...
आम्हा सर्वांसाठी...
झगमगलेला
केदारनाथ मंदिर परिसर...
आणि आमचं
त्रिकूट
केदारनाथ मंदिर
परिसरात..
मे 2016