पुणेः महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले होते. आज राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सध्या महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांचे कौल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळाली. या अटीतटीच्या लढतीत कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलात भाजप महायुतीने बाजी मारल्याचं चित्र दिसत आहे.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र विधानसभेतील पुणे जिल्ह्यातील प्रमुख मतदारसंघांपैकी एक आहे. पुण्याच्या राजकारणात या मतदारसंघाची भूमिका महत्त्वाची आहे. वडगाव शेरी हा पुणे लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. त्यामुळे राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात त्याचे धोरणात्मक महत्त्व वाढले आहे. यावेळी विधानसभेला या मतदारसंघातून बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी - एसपी) आणि सुनील टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्यात प्रमुख लढत होती. या प्रतिष्ठेच्या लढाईत कोण बाजी मारणार हे आज कळणार आहे.