सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 व्यक्ती विशेष

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कोण? निकालापूर्वीचमुख्यमंत्रीपदाबाबत नाना पटोलेंच मोठं विधान

डिजिटल पुणे    22-11-2024 14:56:17

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत, आणि एक्झिट पोलच्या नुसार महायुतीचं सरकार येण्याची शक्यता आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, "मतमोजणी दरम्यान आमचे लक्ष प्रत्येक बुथवर असेल आणि निकालानंतर सरकार बनवण्याचा दावा करू." मुख्यमंत्रिपदाबाबत त्यांनी सांगितले की, तिन्ही पक्ष एकत्र आल्यानंतरच निर्णय होईल.

विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा, असा हट्ट शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धरला होता. परंतु त्यांच्या या हट्टाकडे काँग्रेस त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) शरद पवार यांनी पूर्ण दुर्लक्ष केले. याचा निर्णय निकालानंतर घेतला जाईल, असं दोन्ही पक्षाकंडून स्पष्ट करण्यात आलं. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाचे बहुतांश उमेदवार विजयी होतील, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. याचाच दुसरा अर्थ महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री पदी काँग्रेसचा उमेदवार असेल, हे नक्की झालं आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती