मुंबई : राज्यामध्ये 2024 ची विधानसभा निवडणूक मोठ्या चुरसेने पार पडत आहे. यावर्षी नक्की कोणाचे सरकारी येईल कोण विजयी मिळवेल याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. अशातच 20 नोव्हेंबर रोजी मतदान झालेले आहे. तर आज म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासूनच मतमोजणी चालू झालेली आहे. आणि सुरुवातीपासूनच महायुतीने आघाडी घेतलेली आहे. यामध्ये महायुतीने आत्तापर्यंत 200 जागांचा टप्पा देखील पार केलेला आहे. तर भाजप 125 जागांवर आहे.
महायुती सतत आघाडीवर असल्याने राज्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून चांगला जल्लोष होताना पाहायला मिळत आहे. अशातच महायुद्ध एकनाथ शिंदे यांनी निकालाबाबत त्यांची पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होताना सुरुवातीपासूनच महायुती आघाडीवर आहे. आणि याबद्दल शिंदे हे प्रसार माध्यमांशी बोलले आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की, जनता ही महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलेली आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रतील संपूर्ण जनतेचे आभार मानलेले आहेत. तसेच विजयी झालेल्या उमेदवारांना वर्षा बंगल्यावर येण्याचे देखील त्यांनी सांगितलेले आहे.
एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधताना सांगितले की, “मतदारांचे सगळ्यात आधी आभार मानतो. महायुतीला खूप मोठे यश दिलेले आहे. लाडक्या बहिणींनी मतदान केलेले आहे. त्याचप्रमाणे लाडके भाऊ आणि लाडके शेतकऱ्यांनी देखील आम्हाला भरभरून मतदान केले आहे. गेल्या दोन वर्षात आम्ही जे केले. त्याचे आम्हाला पोचपावती मिळालेली आहे. पुढील काळात आम्ही आमची जबाबदारी आमची वाढली आहे. मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. मतदारांना धन्यवाद देतो की त्यांनी मोठ्या लीडने विजयी केले.”