सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 व्यक्ती विशेष

आता कानाकोपऱ्यात अल्लाहु अकबर नाही तर जय श्रीराम ऐकायला मिळणार ; नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

डिजिटल पुणे    23-11-2024 17:42:31

कणकवली : आज महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकालाचे चित्र आता जवळपास समोर आले आहे. महायुती या निकालामध्ये विजयी होताना दिसत आहे. 12:40 पर्यंत महायुतीला 218 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर महायुतीची रणनीती यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सक्सेसफुल झालेली दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला कौल दिलेला दिसतोय…

कणकवली मधलया लढती ह्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जात होत्या. तर कणकवली विधानसभा मतदारसंघात जनतेने भाजपला कौल दिल्याचा दिसतोय. नितेश राणे विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे संदेश पारकर असा सामना जोरदार रंगला. सध्या आठ फेऱ्यांशी मतमोजणी झालेली आहे. नितेश राणे हे वीस हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहे. कणकवलीत भाजप कार्यकर्त्यांनी त्यामुळे गुलाल उधळत जल्लोष सुरू केलाय. नितेश राणेंच्या कपाळाला गुलाल लागलाय.

यावेळी बोलताना नितेश राणेंनी प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे ते म्हणाले की,” मी तुम्हाला पहिला दिवसापासून बोलत होतो कणकवली, देवगड, वैभवाडीच्या जनतेनं मला तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी द्यायचा ठरवलेला आहे 262 गावात फिरताना मला ते जाणवलं अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, वेगवेगळ्या गावात फिरताना लोक मला सांगायचे नितेश राणे तुम्ही चिंता करू नका तुम्ही राज्यात केलेलं हिंदुत्वाचं काम आम्हाला पसंत आहे. आमचे देवेंद्रजी म्हणालेले हे एक धर्मयुद्ध होतो माझ्या मतदारसंघात माझ्याविरुद्ध जिहादींच्या माध्यमातून विषारी प्रचार केला पण माझ्या मतदारसंघातील हिंदू समाज कडवटपणे माझ्यासोबत राहिला अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.

हा 100% हिंदुत्ववादी विचारांचा मतदारसंघ आहे देवेंद्रजी म्हणाले होते. हे धर्मयुद्ध आहेत ही भगवा विरुद्ध फतवा लढाई होती महाराष्ट्रात आणि कणकवलीत भगवा जिंकला असं नितेश राणे यांनी म्हटलाय नितेश राणेंकडे आठव्या फेरी अखेर 20 हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी आहे. 24 व्या फेरीअखेर लीड 60 हजारांपेक्षा कमी होणार नाही असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केलाय सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे महायुतीचा बालेकिल्लाय कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी तिन्ही जागा आम्ही जिंकणार असं नितेश राणे म्हणाले आहेत महाराष्ट्रात महायुती जिंकली भगवाधारांचं राज्य आलं आता कानाकोपऱ्यात अल्लाहु अकबर नाही तर जय श्रीराम ऐकायला मिळणार असंही नितेश राणे यांनी म्हटलं आणि ते असं म्हणतात एकच जल्लोष सुरू झाला.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती