सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 व्यक्ती विशेष

लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली, त्यामुळे सगळे उताणे पडले – अजित पवार

डिजिटल पुणे    23-11-2024 18:51:35

मुंबई : 'लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. त्यामुळे सगळे उताणे पडले. आता आमच्यावर जबाबादारी वाढली आहे. इतकं मोठं यश महाराष्ट्रात कोणाला मिळालं नव्हतं. आमच्या पाठिंशी केंद्र सरकार आहे. त्यामुळे मोठा आधार आहे. लोकसभेचा निकाल लागला तर तो बरोबर आणि इथला निकाल लागला की बॅलेट पेपर आलं पाहिजे. असं नसतं. वेगवेगळ्या रिजनमध्ये महायुतीला यश मिळालं आहे. काही जागा खूप कमी मतांनी गेल्या आहेत' असं अजित पवार म्हणाले आहेत.

लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली : अजित पवार

कार्यकर्ते राबले, उमेदवार राबले, घटकपक्षांचे सहकारी राबले. सर्वजण आपली निवडणूक आहे असं समजून कामाला लागले. आमच्या योजनांबाबत टीका टिप्पणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हाला अपयश आलं. महाराष्ट्रात अपयश आलं होतं, ते अपयश आम्ही मान्य केलं. त्याच्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प सादर करताना अनेक योजना मांडल्या, त्या लोकप्रिय झाल्या. लाडकी बहीण योजना गेमचेंजर झाली. अंडरकरंट असा बहिणींनी दाखवला की सगळे उताणे पडले, आडवे पडले, हे माझं स्पष्ट मत आहे. 

आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे. एवढ्या प्रचंड बहुमतानं सरकार आलं आहे. मी राजकारणात आल्यापासून 222 आणि तसं 225 महायुतीला जागा मिळाल्या. एवढं कधी पाहिलं नाही. या यशानं हुरळून देखील जाणार नाही. जसे जसे आकडे पाहत होतो, तेव्हा आर्थिक गोष्टी समोर येत होत्या. आर्थिक शिस्त समोर आणू, आम्हाला याचा अनुभव आहे. आमच्या पाठिशी केंद्र सरकार आहे. त्याचा आधार आहे, असं अजित पवार म्हणाले. 

विरोधक निवडणूक टीका करतात बॅलट पेपरनं निवडणूक घ्यायला पाहिजे होती मग लोकसभा निवडणूक देखील बॅलट पेपरवर घ्यायला हवी होती. झारखंड आमच्या हातून गेलं, आम्ही काय म्हणतोय का? असा सवाल अजित पवार यांनी केला. 

महाराष्ट्रातील सर्व विभागातून आम्हाला मतदान झालं आहे. लोकसभेला मराठवाड्यात केवळ एक जागा मिळाली होती, असं शरद पवार म्हणाले. आमच्या महायुतीवरील जबाबदारी वाढलेली आहे. जनतेचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. पाच वर्ष एकोप्यानं काम करेल. अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहे, असं अजित पवार म्हणाले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती