जौनपूर (उत्तर प्रदेश) : लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री 75 वर्षीय संगरु राम यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जौनपूर जिल्ह्यात घडली.उत्तर प्रदेशच्या जौनपूर गावात 75 वर्षीय संगरु राम आणि 35 वर्षीय महिलेच्या लग्नाची चर्चा रंगली होती. पण लग्नानंतर दुसऱ्या दिवशी नवरदेवाच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान मृत्यूच्या रात्री नेमकं काय झालं होता याचा खुलासा महिलेने केला आहे. महिलेने सांगितलेलं सत्य ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. शवविच्छेदन अहवालानुसार मृत्यूचे कारण शॉक/कोमा असल्याचे समोर आले असून, हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पत्नी मनभावती यांनी सांगितले की, मधुचंद्राच्या रात्री ते फक्त माझ्याशी गप्पा मारत होते. लग्न आणि मुलांच्या भविष्याच्या योजनांबद्दल ते माझ्याशी बोलत होते. पण सकाळी अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच सर्व काही संपलं होतं. गौराबादशाहपूर स्टेशनचे प्रभारी प्रवीण यादव यांनी सांगितलं की, शवविच्छेदन अहवालातून संगरु राम यांचा मृत्यू धक्क्याने/कोमा झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. हा नैसर्गिक मृत्यू आहे. कोणतीही संशयित बाब समोर आलेली नाही. कोणतंही औषध किंवा कोणताही ओव्हरडोस झालेला नाही.
कुछमुछ गावातील रहिवासी असणारे संगरु राम यांच्या पत्नीचं एक वर्षापूर्वी निधन झालं होतं. त्यांना मूल नव्हतं. मागील अनेक काळापासून ते एकटे होते आणि शेती करत होते. कुटुंब आणि मुलांचा आधार नसल्याने आपण दुसरं लग्न करायला हवं असं ते वारंवार म्हणत होते. गावातील लोकांना हा त्यांचा हट्ट वाटत होता. पण संगरु यांना खरोखर एक जोडीदार हवा होता. अखेर त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाआधी त्यांनी आपली जमीन विकून पाच लाख रुपये मिळवले होते. यातील काही रक्कम त्यांनी लग्नाच्या तयारीसाठी पत्नीला दिली होती.
मनभावती यांचे हे दुसरे लग्न असून त्यांना पहिल्या लग्नापासून दोन मुली आणि एक मुलगा आहे. “संगरु माझ्या मुलांची जबाबदारी घेतील, या विश्वासाने मी होकार दिला,” असे त्यांनी सांगितले.या घटनेने गावभर हळहळ व्यक्त होत असून, लग्नानंतर अवघ्या 24 तासांतच संसार उजाडल्याने कुटुंबात शोककळा पसरली आहे.
गेल्या सोमवारी त्यांनी जलालपूर पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी मानभावतीशी लग्न केले. मानभावती यांचं हे दुसरे लग्न होतं. त्यांना पहिल्या लग्नापासून दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांनी म्हटलं की, "मी लग्नासाठी तयार नव्हते. पण मला खात्री होती की संगरु राम माझ्या मुलांची जबाबदारी घेईल. या आश्वासनाने मी होकार दिला." सोमवारी कोर्ट मॅरेज झाल्यानंतर मंदिरातील विधीनुसार लग्न झाले. हे लग्न संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनले. लोक म्हणत होते, "वृद्धापकाळातही नवरा असणे सोपे नाही," पण संगरुने सर्वांना दाखवून दिले की त्याचा उत्साह अजूनही तितकाच आहे.
लग्नानंतर पहिली रात्र दोघांनी एकत्र घालवली. ते फार आनंदी होते असं मनभावतीने सांगितलं. ते म्हणाले, आता पुन्हा घरात हालचाली वाढतील. ते वारंवार माझी मुलं आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याबद्दल बोलत होते. रात्री उशिरापर्यंत ते गप्पा मारत होते आणि नंतर झोपून गेले. त्यांचं वागणं अत्यंत सामान्य होतं. पण सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा त्यांची तब्येत बिघडली. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी मृत जाहीर केलं.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लग्नाआधी संगरु यांनी त्यांची जमीन विकली. या जमिनीतून त्यांना पाच लाख रुपये मिळाले. त्यांनी लग्नाच्या तयारीसाठी मनभावती यांना 20 हजार रुपयेही दिले. हे पैसे कपडे, दागिने आणि इतर लग्नाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी वापरले गेले. गावकरी म्हणतात की संगरु लग्नाबद्दल खूप उत्साहित होते. तो वारंवार सांगत होते की आता त्यांचा संसार नव्याने सुरु होईल आणि एकटेपणा दूर होईल. पण कोणाला माहित होते की लग्नाच्या 24 तासांपूर्वीच सर्व काही संपेल.
संगरु राम यांच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मनभावती यांच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्टपणे दिसून येत आहेत. "त्यांनी माझ्या मुलांची जबाबदारी घेण्याचं वचन दिलं होतं. मला वाटलं होतं की आता आयुष्य ठीक होईल. पण ते निघून गेले आणि मला पुन्हा एकटे सोडले," असा शोक त्यांनी व्यक्त केला आहे.