सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात एटीएसची कारवाई, उच्चशिक्षित IT इंजिनिअरला अटक, बॉम्ब तयार करण्याची माहिती असणारं पुस्तक सापडलं
 DIGITAL PUNE NEWS

पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटले अन् भरधाव ट्रकने तीन वाहनांना दिली जोरदार धडक;दोन जखमी

डिजिटल पुणे    29-10-2025 13:22:37

पुणे  :  पुण्यातील नवले पुलाजवळ मंगळवारी पहाटे घडलेल्या एका भीषण अपघात घडलाय. फरश्या घेऊन जाणारा ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने एकामागोमाग तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन वाहनचालक किरकोळ जखमी झाले असून तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडला. 

सिंहगड रोडवरील नवले पुलाजवळ मंगळवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन जण जखमी झाले. फरशा घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या घटनेत तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास कात्रज चौकाकडून फरश्या घेऊन नवले पुलाच्या दिशेने येणारा ट्रक अचानक नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात पुढे गेला आणि रेडिमिक्स डंपर तसेच दोन कारला उडवत निघाला. धडक इतकी जोरदार होती की कार काही फूट पुढे ढकलल्या गेल्या आणि रस्त्याच्या मधोमध अडकल्या. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. सुदैवाने कोणत्याही वाहनचालकाचा जीवितहानी झाली नाही. मात्र, काही वाहनांचे  गंभीर नुकसान झाले आहे. पोलिसांनी मूळ उत्तर प्रदेशातील ट्रकचालक तौफिक इसरार अहमद (वय 32) याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे.

नवले पूल परिसरात यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारचे अपघात घडले आहेत. या परिसरात सतत वाढणारी वाहतूक, ट्रकचा वेग आणि रस्त्यांची अरुंद रचना यामुळे हा परिसर ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जातो. नागरिकांनी अनेकदा येथे वाहतुकीवरील नियंत्रण वाढवावे अशी मागणी केली आहे.

अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. नागरिकांच्या मदतीने आणि पोलिसांच्या तत्परतेने वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली.

या अपघातात दोन वाहनचालक किरकोळ जखमी झाले असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहनांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांनी उत्तर प्रदेश येथील ट्रकचालक तौफिक इसरार अहमद (वय ३२) याला ताब्यात घेतले आहे.

नवले पूल परिसरात यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारचे अपघात झाले आहेत. वाढती वाहतूक, अरुंद रस्ते आणि भरधाव वाहनांचा वेग यामुळे हा परिसर ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जातो. स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा या ठिकाणी वाहतुकीवरील नियंत्रण आणि सुरक्षा उपाययोजना वाढवाव्यात, अशी मागणी केली आहे.


 Give Feedback



 जाहिराती